नोकिया १०६ फिचरफोनची नवीन आवृत्ती दाखल

0

एचएमडी ग्लोबल कंपनीच्या नोकिया १०६ या फिचरफोनची नवीन आवृत्ती आजपासून भारतीय ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

भारतीय बाजारपेठेत फिचरफोनची मागणी कधी काळी खूप प्रचंड प्रमाणात असली तरी आता यात मात्र थोडी घट झाल्याचे दिसून येत आहे. यातच रिलायन्स जिओच्या धडाक्यासमोर बहुतांश कंपन्या गलीतगात्र झाल्या असतांना नोकियाने या क्षेत्रावरील आपले लक्ष कायम ठेवल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने या ब्रँडने काही दिवसांपूर्वीच नोकिया १०६ (२०१८) हे मॉडेल भारतीय ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली होती. हाच फिचरफोन आता भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आला आहे. याला फ्लिपकार्ट आणि अमेझॉन इंडिया पोर्टलवरून अनुक्रमे १,४१५ आणि १,४७८ रूपयात खरेदी करता येणार आहे. याशिवाय, १,४१५ रूपयात हा फिचरफोन देशभरातील शॉपीजमधून उपलब्ध करण्यात आला आहे.

नोकिया १०६ हे मॉडेल भारतात २०१३ साली लाँच करण्यात आलेले आहे. नोकिया १०६ (२०१८) ही याचीच अद्ययावत आवृत्ती आहे. यामध्ये १.८ इंच आकारमानाचा आणि १६० बाय १२० पिक्सल्स क्षमतेचा क्यूक्यूव्हिजीए टिएफटी डिस्प्ले दिलेला आहे. यामध्ये मीडियाटेकचा एमटी६२६१डी हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ४ एमबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ४ एमबी आहे. हे स्टोअरेज मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यातील बॅटरी ८०० मिलीअँपिअर क्षमतेची असून यामध्ये ऑडिओ जॅक आणि मायक्रो-युएसबी पोर्ट दिलेले आहे. या फिचरफोनमध्ये एफएम रेडिओ आणि एलईडी टॉर्च इनबिल्ट अवस्थेत प्रदान करण्यात आली आहे. तर डेंजर डॅशसह काही गेम्स प्रिलोडेड अवस्थेत प्रदान करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here