पबजी मोबाईल गेमच्या अपडेटमध्ये नाविन्यपूर्ण फिचर्स

0
पबजी गेम, pubg game

पबजी मोबाईल या तुफान लोकप्रिय झालेल्या गेमचे ताजे अपडेट सादर करण्यात आले असून यामध्ये अनेक नाविन्यपूर्ण फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

पबजी मोबाईल या गेमने जगभरातील तरूणाईला अक्षरश: वेड लावले आहे. टेनसेंट कंपनीची मालकी असणार्‍या या गेमचे वेळोवेळी अपडेट सादर करण्यात येत असून यात नवनवीन फिचर्सचा समावेश करण्यात येत आहे. या अनुषंगाने संबंधीत गेमचे ०.१०.५ हे ताजे अपडेट उपलब्ध करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात याला आयओएस प्रणालीसाठी सादर केले असून येत्या काही दिवसांमध्ये अँड्रॉइड युजर्सलाही याचे अपडेट मिळणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. यातील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे रॉयल पास सिझन ५ची आजपासून सुरूवात झालेली आहे. यामुळे गेमर्स या नवीन सिझनचा लाभ घेऊ शकतील. या ताज्या अपडेटमध्ये एमके४७ या नवीन वेपनचाही समावेश करण्यात आला आहे. विकेंडी वगळता अन्य मॅप्समध्ये हे शस्त्र वापरता येणार आहे. यामध्ये दोन फायरिंग मोड दिलेले आहेत. तर, लेसर साय या नावाने नवीन अटॅचमेंटदेखील गेमर वापरू शकतो.

पबजी गेमच्या या ताज्या अपडेटमध्ये काही किरकोळ बदलदेखील करण्यात आले आहेत. यामध्ये शॉप, अवतार डिस्प्ले आदी बाबींना थोडे बदलण्यात आले आहे. तर आधीच्या आवृत्तीमधील काही बग यात फिक्स करण्यात आल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. जगभरातील युजर्सला क्रमाक्रमाने याचे अपडेट मिळणार असल्याचे टेनसेंट कंपनीने घोषीत केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here