टिकटॉक अ‍ॅपच्या युजर्ससाठी नवे सुरक्षाविषयक फिचर

0

टिकटॉक या लोकप्रिय व्हिडीओ शेअरींग अ‍ॅपने आपल्या भारतीय युजर्ससाठी नवीन सुरक्षाविषयक फिचर सादर केले आहे.

टिकटॉक हे चीनच्या बाईटडान्स कंपनीच्या मालकीचे अ‍ॅप भारतात सध्या तुफान लोकप्रिय झाले आहे. देशात याचे सुमारे ५.४ कोटींपेक्षा जास्त युजर्स असून यात प्रचंड गतीने भर पडतच आहे. या अ‍ॅपमध्ये कुणीही लिप सिंकींगच्या मदतीने मजेशीर व्हिडीओ बनवून ते शेअर करू शकतो. तथापि, हे अ‍ॅप यातील सुरक्षाविषयक त्रुटींमुळे वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. अलीकडेच या अ‍ॅपवर बंदी घालण्यात यावी अशी मागणीदेखील करण्यात आलेली आहे. हे अ‍ॅप बालकांच्या वापरासाठी नसून यावर मोठ्या प्रमाणात अश्‍लील आणि हेट कंटेंट शेअर होत असल्याचा आरोप केला जात आहे. स्वदेशी जागरण मंचने या अ‍ॅपला भारतात बॅन करण्यात यावे अशी मागणी केली आहे. या पार्श्‍वभूमिवर, टिकटॉक अ‍ॅपने आता खास भारतीय युजर्ससाठी एक फिचर सादर केले आहे. हे फिचर सुरक्षाविषयक बाबीशी संबंधीत आहे. याच्या अंतर्गत आता कुणीही युजर आपल्या कॉमेंट सेक्शनमध्ये कि-वर्डच्या सहाय्याने आक्षेपार्ह प्रतिक्रियांना अटकाव करू शकणार आहे.

टिकटॉकच्या अनेक व्हिडीओजवर अतिशय असभ्य कॉमेंट करण्यात येत असून युजर्ससाठी ही डोकेदुखी बनली आहे. या पार्श्‍वभूमिवर, टिकटॉक अ‍ॅपच्या युजर्सला आता यापासून मुक्ती मिळण्यासाठी हे नवीन फिचर प्रदान करण्यात आल्याचे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here