नवीन रंगाच्या पर्यायात मिळणार इन्फीनिक्सचा ‘हा’ स्मार्टफोन

0

इन्फीनिक्स कंपनीने आपला स्मार्ट ३ प्लस हा तिहेरी कॅमेर्‍यांनी युक्त बजेट स्मार्टफोन आता नवीन रंगाच्या पर्यायात सादर केला आहे.

इन्फीनिक्स कंपनीने गेल्या महिन्यात स्मार्ट ३ प्लस हा स्मार्टफोन सादर केला होता. याला प्रारंभी मिडनाईट ब्लॅक आणि सफायर सायन या रंगाच्या पर्यायात उपलब्ध करण्यात आले होते. आता हेच मॉडेल मोचा ब्राऊन या रंगाच उपलब्ध करण्यात आले आहे. याचे मूल्य ६,९९९ रूपये असून याला फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून उपलब्ध करण्यात आलेले आहे.

वर नमूद केल्यानुसार स्मार्ट ३ प्लस हा सर्वात स्वस्त ट्रिपल रिअर कॅमेर्‍यांनी युक्त असणारा स्मार्टफोन ठरला आहे. याच्या मागील बाजूस तीन कॅमेरे असून यामध्ये १३, २ आणि लो लाईट सेन्सरचा समावेश आहे. या तिन्ही कॅमेर्‍यांच्या मदतीने अतिशय दर्जेदार प्रतिमा घेता येणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यामध्ये पीडीएएफ, ऑटो सीन डिटेक्शन, ड्युअल एलईडी फ्लॅश, एआर स्टीकर्स आदी फिचर्सचा समावेश आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिला असून यात ब्युटी मोड या फिचरचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

याशिवाय, इन्फीनिक्स स्मार्ट ३ प्लस या मॉडेलमध्ये ६.२१ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस म्हणजे १५२० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा २.५ डी डिस्प्ले दिलेला आहे. याचा अस्पेक्ट रेशो १९:५:९ असा आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या पाय आवृत्तीवर आधारित असणार्‍या एक्सओएस ५.० या प्रणालीवर चालणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here