रिअलमी एक्स२ प्रो स्मार्टफोनची नवीन आवृत्ती

0

रिअलमीने आपल्या एक्स२ प्रो या स्मार्टफोनची ६ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेज असणारी नवीन आवृत्ती बाजारपेठेत सादर केली आहे.

ओप्पोची उपकंपनी असणार्‍या रिअलमीने गत महिन्यात रिअलमी एक्स२ प्रो हे मॉडेल बाजारपेठेत सादर केले होते. प्रारंभी याला १२ जीबी रॅम+२५६ जीबी स्टोअरेज आणि ८ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज अशा दोन पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आले होते. आता हाच स्मार्टफोन ६ जीबी रॅम व ६४ जीबी इनबिल्ट स्टोअरेजच्या पर्यायात ग्राहकांना सादर करण्यात आला असून याचे मूल्य २७,९९९ रूपये आहे.

रिअलमी एक्स२ प्रो या मॉडेलमध्ये ६.५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस डिस्प्ले असून यावर संरक्षणासाठी कॉर्नींग गोरीला ग्लास ५ चे संरक्षक आवरण प्रदान करण्यात आले आहे. यात क्वॉलकॉमचा अतिशय वेगवान असा ८५५+ हा प्रोसेसर दिलेला आहे. या मॉडेलच्या मागील बाजूस क्वॉड अर्थात चार कॅमेर्‍यांचा सेटअप दिलेला आहे. यातील मुख्य कॅमेरा ६४ मेगापिक्सल्सचा असून यात सॅमसंगचे जीडब्ल्यू१ हे सेन्सर दिलेले आहे. याच्या जोडीला १३ मेगापिक्सल्सचा टेलीफोटो लेन्स असून याच्या मदतीने २एक्स ऑप्टीकल झूम आणि २० एक्स डिजीटल झूमची सुविधा मिळेल. तिसरा कॅमेरा हा वाईड अँगलने युक्त असून याची क्षमता ८ मेगापिक्सल्सची आहे. तर डेप्थ सेन्सरने युक्त असणारा चौथा कॅमेरा २ मेगापिक्सल्स क्षमतेचा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात १६ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. यातील बॅटरी ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची असून यासोबत ५० वॅट क्षमतेचे व्हिओओसी तंत्रज्ञानाने युक्त असणारे चार्जर दिलेले आहे. याच्या मदतीने ही बॅटरी फक्त ३५ मिनिटांमध्ये चार्ज होत असल्याचा कंपनीचा दावा आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या पाय आवृत्तीपासून विकसित करण्यात आलेल्या कलरओएस ६.१ या प्रणालीवर चालणारा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here