मॅसेंजरच्या लॉगीनसाठी फेसबुक अकाऊंटची आवश्यकता नाही

0
facebook-messenger

फेसबुकने मॅसेंजरच्या लॉगीनसाठी फेसबुक अकाऊंटची अट काढून टाकली असून यामुळे मॅसेंजरचा वापर सुलभ होणार आहे.

फेसबुकने अलीकडच्या काळात मॅसेंजरची स्वतंत्र ओळख जोपासण्यासाठी अनेक फिचर्स देण्यास प्रारंभ केला आहे. या अनुषंगाने आता फेसबुक अकाऊंट नसतांनाही मॅसेंजरचा वापर करता येणार आहे. याबाबत व्हेन्चर बीट या टेक पोर्टलने सविस्तर वृत्त दिले आहे. यानुसार, यापुढे मॅसेंजर वापरतांना फेसबुक अकाऊंटची आवश्यकता राहणार नाही. अर्थात, मोबाईल क्रमांकाचे व्हेरिफिकेशन न करतांनाही मॅसेंजर वापरता येणार आहे. काही युजर्सला हा बदल दिसू लागला असून अन्य सर्व युजर्सला अपडेटच्या स्वरूपात ही सुविधा मिळणार आहे. फेसबुकच्या प्रवक्त्याने हा बदल होत असल्याच्या वृत्ताला होकार दिला आहे. यामुळे आता फोन क्रमांक नसतांनाही मॅसेंजरचा वापर करता येणार आहे.

फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी आधीच मॅसेंजर, इन्स्टाग्राम आणि व्हाटसअ‍ॅप या आपल्या तिन्ही मॅसेंजर्सला एकमेकांशी संलग्न करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्‍वभूमिवर, आता मॅसेंजरला फेसबुकच्या मुख्य अ‍ॅपपासून स्वतंत्र करण्यास प्रारंभ झाल्याचे आता संकेत मिळाले आहेत. मॅसेंजरच्या लॉगीनसाठी फेसबुक अकाऊंटची अट काढून टाकण्याचा निर्णय हे या दिशेने टाकलेले महत्वाचे पाऊल मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here