भारतात मिळणार नोकिया २.२ स्मार्टफोन

0

एचएमडी ग्लोबल कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी नोकिया २.२ या किफायतशीर मूल्य असणारा स्मार्टफोन सादर केला आहे.

नोकियाची मालकी असणार्‍या एचएमडी ग्लोबल कंपनीने अलीकडच्या काळात भारतीय बाजारपेठेवर जाणीवपूर्वक लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. अलीकडेच कंपनीने नोकिया ४.२ हे मॉडेल लाँच केले होते. यानंतर आता नोकिया २.२ हा स्मार्टफोन दोन व्हेरियंटमध्ये लाँच केला आहे. याच्या २ जीबी रॅम+१६ जीबी स्टोअरेजच्या मॉडेलचे मूल्य ७,६९९ तर ३ जीबी रॅम+३२ जीबी स्टोअरेजच्या व्हेरियंटचे मूल्य ८,६९९ रूपये आहे. मात्र मर्यादीत कालखंडासाठी हे दोन्ही व्हेरियंट अनुक्रमे ६,९९९ आणि ७,९९९ रूपये मुल्यात उपलब्ध करण्यात आले आहे. या दोन्ही मॉडेल्ससाठी रिलायन्सच्या जिओने २२०० रूपयांच्या कॅशबॅकची ऑफरदेखील जाहीर केली आहे.

नोकिया २.२ या मॉडेलचे वैशिष्ट्य म्हणजे हा स्मार्टफोन अँड्रॉइड वन या प्रोग्रॅमच्या अंतर्गत लाँच करण्यात आला आहे. यामुळे या मॉडेलमध्ये अँड्रॉइडच्या अद्ययावत आवृत्तीचे सर्व अपडेटस् हे त्वरीत मिळणार आहेत. तर गुगल असिस्टंटसाठी यात खास बटनदेखील प्रदान करण्यात आलेले आहे. उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, नोकिया २.२ या मॉडेलमध्ये ५.७ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस क्षमतेचा तसेच १९:९ असा अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले दिलेला आहे. यावर वॉटरड्रॉप नॉच प्रदान करण्यात आला आहे. या मॉडेलमध्ये मिडियाटेकचा हेलीओ पी २२ हा प्रोसेसर दिला आहे. वर नमूद केल्यानुसार याची रॅम व स्टोअरेज असणार आहे. यातील मुख्य कॅमेरा १३ तर फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्सचा दिलेला आहे. यातील बॅटरी ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची असून हा कॅमेरा अँड्रॉइडच्या पाय या अद्ययावत आवृत्तीवर चालणारा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here