दोन व्हेरियंटमध्ये मिळणार नोकिया ३.२ स्मार्टफोन

0

एचएमडी ग्लोबलने नोकिया ३.२ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दोन व्हेरियंटमध्ये सादर करण्याची घोषणा केली आहे.

यावर्षीच्या प्रारंभी झालेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये नोकिया ३.२ या मॉडेलचे अनावरण करण्यात आले होते. आता हाच स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आला आहे. याचे २ जीबी रॅम+१६ जीबी स्टोअरेज आणि ३ जीबी रॅम+३२ जीबी स्टोअरेज असे दोन व्हेरियंट अनुक्रमे ८,९९० आणि १०,७९० रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहेत. याला नोकियाच्या ऑनलाईन स्टोअरसह देशभरातील शॉपीजमधून खरेदी करता येईल.

नोकिया ३.२ या मॉडेलमध्ये ६.२६ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस (१५२० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा १९:९ अस्पेक्ट रेशो असणारा आणि डॉट नॉचयुक्त एलसीडी डिस्प्ले दिलेला आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ४२९ हा प्रोसेसर दिलेला आहे. वर नमूद केल्यानुसार याचे दोन व्हेरियंट असतील. यातील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा तर फ्रंट कॅमेरा ५ मेगपिक्सल्सचा देण्यात आलेला आहे. यातील बॅटरी ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या पाय या अद्ययावत आवृत्तीवर चालणारा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here