नोकिया ४.२ भारतात लाँच : जाणून घ्या सर्व फिचर्स

0

एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकिया ४.२ हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत सादर केले असून याला दोन रंगाच्या पर्यायात उपलब्ध करण्यात आले आहे.

नोकिया ब्रँडची मालकी असणार्‍या एचएमडी ग्लोबल कंपनीने या वर्षाच्या प्रारंभी झालेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये नोकिया ४.२ या मॉडेलचे अनावरण केले होते. यानंतर आता हे मॉडेल भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आले आहे. याला ब्लॅक आणि पिंक या दोन रंगाच्या पर्यायांमध्ये १०,९९० रूपयात सादर करण्यात आले आहे. नोकिया ४.२ या मॉडेलमध्ये गुगल असिस्टंट हा व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंटसाठी स्वतंत्र बटन प्रदान करण्यात आले आहे. याच्या मदतीने कुणीही ध्वनी आज्ञावली म्हणजे व्हाईस कमांडचा वापर करून विविध फंक्शन्सचे कार्यान्वयन करू शकतो.

नोकिया ४.२ या मॉडेलमध्ये ५.७१ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस म्हणजे १५२० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा व १९:९ अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले देण्यात आला आहे. यावर २.५ डी वक्राकार ग्लास असून यावर वॉटरड्रॉप नॉचदेखील प्रदान करण्यात आला आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ४३९ हा प्रोसेसर आहे. याची रॅम २ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. याच्या मागील बाजूस १३ व २ मेगापिक्सल्स कॅमेर्‍यांचा ड्युअल सेटअप असून पुढील बाजूस ४.२ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. यातील बॅटरी ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची असून हा स्मार्टफोन अँड्रॉइड ९.० पाय या अद्ययावत आवृत्तीवर चालणारा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here