फ्लिपकार्टवरून मिळणार नोकियाचा स्मार्ट टिव्ही

0

एचएमडी ग्लोबल कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी स्मार्ट टिव्ही सादर केला असून याला फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे.

नोकिया ब्रँडची मालकी असणार्‍या एचएमडी ग्लोबलने आधीच भारतीय ग्राहकांसाठी स्मार्ट टिव्ही सादर करणार असल्याचे संकेत दिले होते. याचे टिझरदेखील जारी करण्यात आले होते. या पार्श्‍वभूमिवर, आज नोकिया स्मार्ट टिव्ही लाँच करण्यात आला आहे. हे मॉडेल ५५ इंच आकारमानात सादर करण्यात आले असून याचे मूल्य ४१,९९९ रूपये आहे. यात ५५ इंच आकारमानाचा आणि फोर-के म्हणजेच अल्ट्रा हाय डेफिनेशन क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. यात डॉल्बी व्हिजन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला असल्याने युजरला अतिशय दर्जेदार दृश्यानुभूती घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यात जेबीएलची ऑडिओ सिस्टीम असून याला डॉल्बी ऑडिओ आणि डीटीएस ट्रु-साऊंड प्रणालींची जोड दिलेली आहे. यामध्ये डीप बास इफेक्ट प्रदान करण्यात आला आहे. अर्थात, यात फोर-के रेझोल्युशनसह दर्जेदार ध्वनी प्रणाली प्रदान करण्यात आली आहे.

नोकियाचा स्मार्ट टिव्ही अँड्रॉइड ९ या आवृत्तीवर चालणारा असून यात प्ले स्टोअरवरील विविध अ‍ॅप्स इन्स्टॉल करून वापरण्याची सुविधा दिलेली आहे. या टिव्हीमध्ये गुगलचे क्रोमकास्ट उपकरण इनबिल्ट अवस्थेत दिलेले असल्याने स्मार्टफोनवरील व्हिडीओजला टिव्हीवर पाहता येणार आहे. यासोबत रिमोट कंट्रोल दिलेला असून यात गुगल असिस्टंट दिलेला आहे. यामुळे कुणीही ध्वनी आज्ञावली म्हणजेच व्हाईस कमांडचा उपयोग करून विविध फंक्शन्सचा वापर करू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here