फेसबुकचे नोटिफाय अॅप सादर

0

फेसबुकने विविध वर्गवारीतील ब्रेकिंग न्यूज देणारे नोटिफाय हे स्वतंत्र अॅप आयओएससाठी सादर केले आहे.

फेसबुक कंपनीने अलीकडेच नोटिफाय हे अॅप सादर करण्याची घोषणा केली होती. यात जगभरातील वृत्तपत्रे, वृत्तसंस्था, वाहिन्या आणि न्यूज पोर्टल्सच्या स्त्रोतांमधून युजरला हव्या त्या वर्गवारीतील ब्रेकिंग न्यूज देणार असल्याचे सांगण्यात आले होते. अॅपलने अलीकडेच याच प्रकारात ऍपल न्यूज हे स्वतंत्र ऍप लॉंच केले असून गुगलचे आधीच न्यूज स्टँड या नावाचे अॅप आहे. या बाबींचा विचार करता आधीच्या दोन्ही अॅपला फेसबुक टक्कर देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

फेसबुक साईटने अलीकडेच आयओएस प्रणालीवर ‘इन्स्टंट आर्टीकल्स’ही अनोखी सेवा सादर केली आहे. या पाठोपाठ आता फेसबुक आपल्या नोटिफाय या अॅपच्या माध्यमातून मीडियातल्या घडामोडी अचूकपणे आपल्या युजर्सला प्रदान करण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here