अरेच्चा…आता फोटोमधील व्यक्ती रिमूव्ह करणारे अ‍ॅप !

0

कोणत्याही फोटोमधील व्यक्ती रिमूव्ह करण्यासाठी इमेज एडिटरची आवश्यकता असून यासाठी आत्यंतीक कौशल्य आवश्यक असते. तथापि, आता बायबाय कॅमेरा या नावाने सादर करण्यात आलेले अ‍ॅप हेच काम स्वयंचलीत पध्दतीत करणार आहे.

फोटोशॉपसह अन्य इमेज एडिटींग सॉफ्टरवेअरमध्ये कोणत्याही फोटोमधील व्यक्ती रिमूव्ह करता येतो. तथापि, ही प्रक्रिया खूप किचकट आहे. या पार्श्‍वभूमिवर, आता अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवर बायबाय कॅमेरा हे अ‍ॅप सादर करण्यात आले असून यात हीच प्रक्रिया अतिशय सोप्या पध्दतीत पार पडणार आहे. या अ‍ॅपमध्ये कोणताही प्रतिमा अपलोड केल्यानंतर काही क्षणातच यात असणारा माणूस/माणसे हे आपोआप रिमूव्ह होणार आहेत. याच्या ठिकाणी मागाचा भाग आपोआप भरला जातो. यासाठी या अ‍ॅपमध्ये आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स म्हणजेच कृत्रीम बुध्दीमत्तेचा वापर करण्यात आलेला आहे. हे अ‍ॅप आयओएस प्रणालीसाठी सादर करण्यात आलेले आहे. अ‍ॅप स्टोअरवरून ते इन्टॉल करता येईल. अर्थात, यासाठी तीन डॉलर्सची आकारणी करण्यात आलेली आहे.

अनेक महत्वाच्या स्थळांवर लोकांची गर्दी असते. यामुळे गजबजलेल्या ठिकाणची छायाचित्रे काढण्यासाठी अडचणी येत असतात. या पार्श्‍वभूमिवर, बायबाय कॅमेरा अ‍ॅप वरदान ठरणार आहे. अर्थात, याचा वापर करून कोणत्याही फोटोमधील लोकांना हटविणे शक्य असले तरी प्राणी वा पक्षी आदींना यातून रिमूव्ह करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. हे अ‍ॅप डामजन्स्की या कलावंताच्या ‘डू समथिंग गुड’ या कंपनीने विकसित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here