फेसबुक सांगणार : तुम्ही कोणतीही पोस्ट/जाहिरात का बघताय ?

0

फेसबुकने आता नवीन फिचर्सच्या माध्यमातून युजरला त्याच्या न्यूजफिडमध्ये दिसणारी पोस्ट अथवा जाहिरात का दाखवतोय याची माहिती देण्याचे जाहीर केले आहे.

न्यूजफिड हा फेसबुकचा आत्मा आहे असे म्हटले तर फारसे वावगे ठरणार नाही. यामुळे फेसबुकने यात युजर्सला नवनवीन सुविधा देण्याला सातत्याने प्राधान्य दिले आहे. या अनुषंगाने आता युजर्ससाठी दोन फिचर्स लाँच करण्यात आले आहेत. याच्या अंतर्गत कोणताही युजर हा त्याच्या न्यूजफिडमधील कोणतीही पोस्ट ही त्याला का दाखविण्यात येतेय? याची अचूक माहिती देणार आहे. कोणत्याही पोस्टच्या उजव्या बाजूस ड्रॉप डाऊन या पध्दतीत क्लिक केल्यावर याची माहिती मिळणार आहे. यासाठी फेसबुकने तीन निकषांचा विचार केला आहे. यात पहिली बाब म्हणजे कोणताही युजर हा कोणते लोक, ग्रुप अथवा पेजेससोबत जास्त इंटरअ‍ॅक्शन करतो ? दुसरे म्हणजे युजर कोणतीही पोस्ट, लिंक अथवा व्हिडीओजसोबत नेमका कसा रिअ‍ॅक्ट होतो; आणि तो युजर फॉलो करत असलेले लोक, पेजेस अथवा ग्रुप्समधून शेअर करण्यात आलेल्या प्रतिमांची लोकप्रियता हे तीन निकष लावण्यात आले आहेत. या निकषांनुसार युजरला कोणतीही पोस्ट दाखविण्यात येणार असल्याची माहिती मिळणार आहे.

दरम्यान, फेसबुकने आधीच २०१४ साली लाँच केलेल्या मी ही जाहिरात का बघतोय ? या फिचरमध्येही थोडा बदल करण्यात आलेला आहे. यामध्ये आधी प्राथमिक स्वरूपाच्या माहितीचा समावेश होता. आता यात कोणत्याही युजर्सच्या इंटरेस्ट ग्रुपशी संबंधीत जाहिरात दाखविण्यात येणार असून याचीही माहिती त्या युजरला देण्यात होती. यासोबत आता संबंधीत जाहिरातदाराचे त्या युजर्सशी असणारे संबंध दर्शविण्यात येतील. याच्या जोडीला त्या जाहिरातदाराने अपलोड केलेली माहिती तसेच तो कुणा थर्ड पार्टी मार्केटींग कंपनीसोबत काम करत असेल तर ही माहितीदेखील युजरला पाहता येणार आहे.

या दोन फिचर्सच्या माध्यमातून फेसबुकने आपल्या युजर्ससाठी पारदर्शकतेच्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकल्याचे मानले जात आहे. फेसबुकने याबाबत एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली आहे.

Why Am I Seeing This Post?

Facebook ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಮಾರ್ಚ್ 31, 2019

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here