व्हाटसअ‍ॅपचे स्टेटस् फेसबुक व इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करण्याची सुविधा

0

व्हाटसअ‍ॅपचे युजर्स आता आपले स्टेटस् हे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर स्टोरीच्या स्वरूपात शेअर करू शकणार आहेत.

व्हाटसअ‍ॅपचे स्टेटस् हे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर शेअर करता येणार असल्याचे चर्चा कधीपासूनच सुरू होती. मध्यंतरी हे फिचर प्रयोगात्मक अवस्थेत प्रदान करण्यात आल्याची माहितीदेखील समोर आली होती. आता ही सुविधा सर्व युजर्सला क्रमाक्रमाने देण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर स्टोरी हे फिचर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले आहे. याच्या अंतर्गत अपलोड करण्यात आलेली पोस्ट, प्रतिमा अथवा व्हिडीओ हा २४ तास लाईव्ह राहून नंतर नष्ट होत असून याला अमाप लोकप्रियता लाभली आहे. तर दुसरीकडे व्हाटसअ‍ॅपचे स्टेटस्देखील स्टोरी प्रमाणेच २४ तासांपर्यंत लाईव्ह राहत असते. व्हाटसअ‍ॅपच्या युजर्समध्येही याची लोकप्रियता वाढीस लागली आहे. यामुळे आता व्हाटसअ‍ॅपने स्टेटसला फेसबुक आणि इन्स्टाग्राम स्टोरीच्या स्वरूपात शेअर करण्याची दिलेली सुविधा लक्षणीय मानली जात आहे. विशेष करून या माध्यमातून व्हाटसअ‍ॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामला एकमेकांशी कनेक्ट करण्याच्या दिशेने हे महत्वाचे पाऊल असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

दरम्यान, व्हाटसअ‍ॅपने आता म्युट केलेल्या स्टेटसला अधिक चांगल्या प्रकारे मॅनेज करण्याची सुविधा देणारे फिचर युजर्सला प्रदान केले आहे. आधी याला प्रयोगात्मक अवस्थेत सादर करण्यात आले होते. आता अँड्रॉइड युजर याचा प्रत्यक्ष वापर करू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here