आता येणार पाच दिवसांचा बॅकअप देणारी बॅटरी

0

तंत्रज्ञांनी आता तब्बल पाच दिवसांचा बॅकअप देणारी बॅटरी विकसित केली असून ही लिथीअम सल्फर या प्रकारातील बॅटरी असणार आहे.

ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न शहरात असणार्‍या मोनाश विद्यापीठाच्या तंत्रज्ञांनी आजवरची सर्वात दर्जेदार बॅटरी तयार केली असून याचे पेटंट घेण्यात आलेले आहे. सध्या स्मार्टफोनमध्ये लिथीयम आयन या प्रकारातील बॅटरीचा वापर करण्यात येतो. तर या नवीन बॅटरीमध्ये लिथीयम सल्फरचा वापर करण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये ही बॅटरी वापरल्यास पाच दिवसांचा बॅकअप मिळणार आहे. तर हीच बॅटरी इलेक्ट्रीक कारमध्ये वापरली असता, एका चार्जमध्ये तब्बल एक हजार किलोमीटर इतके मायलेज मिळणार आहे. खरं तर यात लिथीयम आयन या प्रकारातील बॅटरीजचेच मटेरिलयल वापरण्यात येणार आहे. तथापि, यातील कॅथोड हा सल्फरचा असणार आहे. यामुळे यातील विद्युत उर्जा ही तुलनेत प्रदीर्घ काळ टिकणार असल्याचे याला विकसित करणार्‍या तंत्रज्ञांनी नमूद केले आहे.

बॅटरी हा बहुतांश अत्याधुनीक उपकरणांसह ई-व्हेईकल्सचा आत्मा आहे. याच्या बॅकअप क्षमतेत वाढ करण्याचे प्रयत्न जगभरात सुरू असतांना ऑस्ट्रेलियन संशोधकांना यात आलेले यश हे लक्षणीय मानले जात आहे. याचा विशेष करून ई-वाहन उद्योगावर अतिशय अनुकुल परिणाम होईल असे मानले जात आहे. येत्या काही महिन्यांमध्ये ही बॅटरी व्यावसायिक पातळीवर वापरण्यात येईल अशी माहिती तंत्रज्ञांच्या या चमूने दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here