गुगल मॅप्सच्या अ‍ॅपवरच पब्लीक प्रोफाईल अपडेट करण्याची सुविधा

0

गुगल मॅप्सने आता पब्लीक प्रोफाईल अ‍ॅपवरूनच बदलण्याची सुविधा प्रदान केली असून या माध्यमातून युजर्सची सुविधा होणार आहे.

गुगल मॅप्सवर आतापर्यंत कुणाही युजरला त्याचे पब्लीक प्रोफाईल बदलायचे असेल तर त्यासाठी वेबवरून लॉगीन करावे लागत असे. आता मात्र याची सुविधा थेट अ‍ॅपवरूनच मिळणार आहे. गुगल मॅप्सचे अँड्रॉइड अ‍ॅप वापरणारा युजर आता अ‍ॅपवरूनच आपल्या पब्लीक प्रोफाईलची माहिती संपादीत करू शकतो. यात तो हवा तो प्रोफाईल फोटो व संबंधीत माहिती टाकू शकतो. तसेच आपले हे पब्लीक प्रोफाईल कुणी पहावे याची सेटींगसुध्दा यात प्रदान करण्यात आलेली आहे. पहिल्या टप्प्यात हे फिचर अँड्रॉइड युजर्सला प्रदान करण्यात आले असून लवकरच आयओएसमध्येही ही सुविधा मिळण्याची शक्यता आहे.

गुगल मॅप्सने काही दिवसांपूर्वीच आपल्या युजर्सला इन्कॉग्नीटो मोड वापरण्याची सुविधा दिली आहे. याला कार्यान्वित केल्यानंतर त्या युजरची हिस्ट्री त्याच्या अकाऊंटमध्ये सेव्ह होत नाही. अनामीकपणे मॅप्स वापरण्यासाठी हे फिचर अतिशय उपयुक्त आहे. या पाठोपाठ आता अ‍ॅपवरून प्रोफाईल अपडेट करण्याची सुुविधा प्रदान करण्यात आली आहे.

गुगल मॅप्सवर प्रोफाईल अपडेट कसे कराल ?

१) गुगल मॅप्सचे अ‍ॅप उघडून वरील डाव्या बाजूस असणार्‍या मेन्यूवर क्लिक करा.

२) प्रोफाईलमार्गे एडिट प्रोफाईल या पर्यायावर क्लिक करा. यानंतर एडिट नेम अँड फोटो हा पर्याय निवडून संबंधीत माहिती व छायाचित्र अपडेट करून सेव्ह करता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here