अरे व्वा…आता फेसबुकवर सिंगल कॅमेर्‍यानेही शेअर करता येणार थ्री-डी प्रतिमा !

0

फेसबुकवर लोकप्रिय झालेल्या थ्री-डी प्रतिमा आता सिंगल कॅमेरा असणार्‍या स्मार्टफोनमधूनही शेअर करता येणार आहे. कंपनीने याबाबत घोषणा केली आहे.

ऑक्टोबर २०१८ मध्ये फेसबुकने आपल्या युजर्ससाठी थ्री-डी अर्थात त्रिमीतीय प्रतिमा अपलोड करून शेअर करण्याची सुविधा दिलेली आहे. स्मार्टफोनमध्ये दोन अथवा त्यापेक्षा जास्त कॅमेरे असल्यास थ्री-डी इमेज घेता येतात. म्हणजेच कॅमेर्‍यात डेप्थ सेन्सर असणे यासाठी आवश्यक होते. यासोबत महत्वाची बाब म्हणजे आजवर फक्त पोर्ट्रेट मोड अर्थात कॅमेरा उभा धरूनच थ्री-डी प्रतिमा काढून ती फेसबुकवर शेअर करता येत होती. आता मात्र फेसबुकने सिंगल कॅमेरा असणार्‍या स्मार्टफोनमधूनही या प्रकारच्या इमेजेस शेअर करण्याची सुविधा दिली आहे. याबाबत एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे.

यानुसार आता सिंगल कॅमेर्‍यातून काढलेल्या फोटोलाही थ्री-डी इफेक्ट प्रदान करून याला फेसबुकवरून शेअर करता येणार आहे. यासाठी फेसबुकने कृत्रीम बुध्दीमत्ता (आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स) आणि मशीन लर्नींग या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. याच्या मदतीने कोणत्याही फोटोग्राफला डेप्थ प्रदान करता येणार आहे. अर्थात, तो फोटो द्विमीतीय (टु-डी) असला तरी तो पाहतांना त्रिमीतीय (थ्री-डी) वाटणार आहे. यासोबत महत्वाची बाब म्हणजे आता फक्त पोर्ट्रेट मोडच नव्हे तर लँडस्केप मोडमधूनही थ्री-डी फोटो शेअर करता येतील. अर्थात, आता स्मार्टफोन उभा धरा की आडवा…थ्री-डी फोटो शेअर करणे सुलभ होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here