आता ऑफलाईनही मिळणार नोकियाचा ‘हा’ स्मार्टफोन

0
नोकिया ५.१ प्लस, nokia 5.1 plus

एचएमडी ग्लोबल कंपनीने आपला नोकिया ५.१ हा स्मार्टफोन आता ऑफलाईन पध्दतीतही ग्राहकांना उपलब्ध केला आहे.

नोकिया ब्रँडची मालकी असणार्‍या एचएमडी ग्लोबल कंपनीने नोकिया ५.१ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर केला असून याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आजवर हे मॉडेल फक्त नोकिया स्टोअर आणि फ्लिपकार्टवरून ऑनलाईन या प्रकारातच उपलब्ध होते. तथापि, उद्या अर्थात १५ जानेवारीपासून हा स्मार्टफोन ऑफलाईन या प्रकारातही उपलब्ध केला जाणार आहे. अर्थात हा स्मार्टफोन आता देशभरातील शॉपीजमधूनही ग्राहक खरेदी करू शकतात.

हे मॉडेल अँड्रॉइड वन या प्रणालीवर चालणारे आहे. अर्थात यामध्ये अँड्रॉइडच्या ताज्या आवृत्तीचे अपडेट सर्वात पहिल्यांदा मिळणार आहे. याचा लूक अतिशय आकर्षक असून याला ग्लासचे वेष्टन प्रदान करण्यात आले आहे. यामध्ये ५.८६ इंच आकारमानाचा व एचडी प्लस म्हणजे १५२० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा अस्पेक्ट रेशो १९:९ असा दिलेला आहे. तर याच्या वरील बाजूस नॉच देण्यात आलेला आहे. यात मीडियाटेकचा हॅलो पी६० हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुुविधा दिलेली आहे.

नोकिया ५.१ प्लस या मॉडेलमध्ये मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात १३ व ५ मेगापिक्सल्सच्या दोन कॅमेर्‍यांचा समावेश आहे. यामध्ये एलईडी फ्लॅश आणि पीडीएएफ आदी फिचर्सचा समावेश आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे. यात कृत्रीम बुध्दीमत्ता म्हणजेच आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याच्याच मदतीने यात फेस अनलॉक हे फिचर कार्यान्वित होणार आहे. तर यातील बॅटरी ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here