वनप्लसचा तब्बल १२ जीबी रॅमयुक्त स्मार्टफोन

0

वनप्लस कंपनीने वनप्लस ७ टी प्रो मॅकलॉरेन एडिशन हा स्मार्टफोन लाँच केला असून यात तब्बल १२ जीबी रॅम प्रदान करण्यात आली आहे.

अलीकडेच ६ आणि ८ जीबी रॅम असणारे स्मार्टफोन प्रचलीत होत आहेत. या पार्श्‍वभूमिवर, वनप्लस कंपनीने चक्क १२ जीबी रॅम असणारे मॉडेल सादर करून या स्पर्धेत आघाडी घेतली आहे. या कंपनीने नुकतेच वनप्लस ७ टी प्रो आणि वनप्लस ७ टी प्रो मॅकलॉरेन एडिशन हे दोन प्रिमीयम अर्थात उच्च श्रेणीतील मॉडेल्स सादर केले आहेत. यातील बहुतांश फिचर्स हे समान आहेत. फक्त रॅमचा फरक असून वनप्लस ७ टी प्रो मॉडेलची रॅम ८ जीबी तर मॅकलॉरेन आवृत्तीची रॅम १२ जीबी आहे. तर दोन्ही मॉडेल्समध्ये २५६ जीबी इतके इनबिल्ट स्टोअरेज प्रदान करण्यात आलेले आहे. दोन्हींमधील उर्वरित फिचर्स समान आहेत. यात या दोन्ही मॉडेल्समध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८५५+ हा प्रोसेसर दिलेला आहे. तर यातील बॅटरी ४०८५ मिलीअँपिअर क्षमतेची आहे. याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेर्‍यांचा सेटअप दिलेला आहे. यातील प्रमुख कॅमेरा ४८ मेगापिक्सल्सचा आहे. याला ३ एक्स ऑप्टीकल झूम व टेलीफोटो लेन्सयुक्त ८ मेगापिक्सल्स तर अल्ट्रा वाईड अँगलने युक्त १६ मेगापिक्सल्सच्या दोन कॅमेर्‍यांची जोड दिलेली आहे. र दोन्हींमध्ये २-के क्षमतेच्या डिस्प्लेने युक्त असणारा ६.६७ इंच आकारमानाचा डिस्प्ले दिलेला आहे.

वनप्लस ७ टी प्रो या मॉडेलचे मूल्य ५३,९९९ तर वनप्लस ७ टी प्रो मॅकलॉरेन आवृत्तीचे मूल्य ५८,९९९ रूपये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here