खास गेमर्ससाठी ऑपेरा जीएक्स ब्राऊजर सादर

0

ऑपेराने खास गेमर्ससाठी ऑपेरा जीएक्स हे ब्राऊजर सादर केले असून यात खास गेमिंगसाठी विविध फिचर्स प्रदान करण्यात आले आहेत.

स्मार्टफोन अ‍ॅप्स, गेमिंग कन्सोल्स आदींच्या माध्यमातून खेळले जात असले तरी इंटरनेट ब्राऊजरवरून गेमिंगचा आनंद लुटणार्‍यांची संख्यादेखील लक्षणीय आहे. मात्र ब्राऊजरवरून गेम्स खेळत असतांना अनेक अडचणी येत असतात. एक तर बर्‍याचदा युजर्सचा संगणक वा लॅपटॉप हँग होते. रॅमचा वापर जास्त झाल्यास स्पीड कमी होतो. या पार्श्‍वभूमिवर ऑपेरा जीएक्स हे नवीब ब्राऊजर लाँच करण्यात आले आहे. हे गेमर्ससाठी सादर करण्यात आलेले जगातील प्रथम ब्राऊजर ठरले आहे. यातील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे कोणताही गेम खेळतांना सीपीयूचा वापर, रॅमचा वापर आदींसह संगणकातील नेमके कोणते घटक हे किती प्रमाणात वापरले जात आहेत याची अचूक माहिती युजरला मिळणार आहे. यामुळे गेमरला वेळीच माहिती मिळत असल्यामुळे हँग होण्यासारख्या अडचणींपासून मुक्तता मिळणार आहे.

याच्या जोडीला ऑपेरा जीएक्स या ब्राऊजरवरून युजर आपल्या ट्विच अकाऊंटचे लॉगीन करू शकतो. यामुळे तो फॉलो करत असणार्‍या गेमर्सची स्ट्रीमिंग सुरू झाल्यानंतर त्याला नोटिफिकेशनच्या माध्यमातून याची माहिती मिळण्याची सुविधा यामुळे मिळणार आहे. तसेच यात जीएक्स कॉर्नर या स्वतंत्र विभाग असून यात गेमींगशी संबंधीत विविध वृत्त, लेख, व्हिडीओज आदी एकाच ठिकाणी पाहता येतील. याचे बाह्यांग हे अतिशय आकर्षक असे आहे. याचे बॅकग्राऊंड हे डार्क व रेड या थीमवर आधारित असून यात युजरच्या आवडीनुसार कस्टमायझेशन करण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. ऑपरा जीएक्स या ब्राऊजरची प्राथमिक स्वरूपाची आवृत्ती विंडोज प्रणालीच्या युजर्ससाठी सादर करण्यात आली असून कंपनीच्या संकेतस्थळावरून याला डाऊनलोड करता येणार आहे. साधारणपणे या वर्षाच्या अखेरीस याची स्थिर आवृत्ती सादर करण्यात येणार असल्याची माहिती ऑपेरातर्फे देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here