इनबिल्ट क्रिप्टो वॅलेटने सज्ज रिबॉर्न ३ ब्राऊजर

0

ऑपेराने आपली रिबॉर्न ३ ही नवीन आवृत्ती सादर केली असून यात इनबिल्ट क्रिप्टो वॅलेटसह अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे.

ऑपेरा ब्राऊजरची ६० वी आवृत्ती सादर करण्यात आली असून याला रिबॉर्न ३ असे नाव देण्यात आलेले आहे. हे डेस्कटॉप ब्राऊजर असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे. मात्र यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे यात इनबिल्ट क्रिप्टो वॅलेट प्रदान करण्यात आले आहे. यामुळे कुणीही याच्या माध्यमातून ब्लॉकचेनच्या सुरक्षा कवचासह क्रिप्टोकरन्सीजचा वापर करून अतिशय सुरक्षितपणे व्यवहार करू शकतो. अलीकडच्या काळात ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे ऑपेराने आता थेट ब्राऊजरमध्येच ब्लॉकचेनवर आधारित असणार्‍या वेब ३ या सुरक्षा प्रणालीने सज्ज असणारे वॅलेट दिल्यामुळे युजर्सची सोय होणार आहे. हे वॅलेट डेस्कटॉपसह संबंधीत युजरच्या अँड्रॉइड स्मार्टफोनशीही संलग्न करता येणार आहे.

रिबॉर्न ३ या ब्राऊजरमध्ये व्हीपीएन अर्थात व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कची सुविधादेखील प्रदान केली आहे. यामुळे कुणीही युजर अतिशय सुरक्षीतपणे इंटरनेट सर्फींग करू शकतो. याशिवाय रिबॉर्न ३ या आवृत्तीमध्ये अतिशय आकर्षक अशी डिझाईनदेखील देण्यात आलेली आहे. हे ब्राऊजर लाईट आणि डार्क या दोन थीम्समध्ये युजरला वापरता येणार आहे. याला विंडोज, मॅक आणि लिनक्स या तिन्ही ऑपरेटींग प्रणालींसाठी सादर करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here