चार कॅमेर्‍यांनी युक्त ओप्पो एफ १५

0

ओप्पो कंपनीने एफ १५ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर केला असून यात चार कॅमेर्‍यांच्या सेटअपसह अनेक सरस फिचर्सचा समावेश आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ओप्पो एफ १५ स्मार्टफोनच्या आगमनाबाबत उत्सुकता लागली होती. या पार्श्‍वभूमिवर, आज हे मॉडेल भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आले. यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे. यातील सर्वात लक्षणीय बाब ही अर्थातच यातील चार कॅमेर्‍यांचा सेटअप असल्याची आहे. यातील प्रमुख कॅमेरा हा ४८ मेगापिक्सल्सचा असून याला ८ मेगापिक्सल्सचा वाईड लेन्स, २ मेगापिक्सल्सचा मोनोक्रोम आणि २ मेगापिक्सल्सच्याच डेप्थ सेन्सरची जोड देण्यात आलेली आहे. या सर्व कॅमेर्‍यांच्या मदतीने अतिशय दर्जेदार छायाचित्रे आणि व्हिडीओ चित्रीत करता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात १६ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे.

ओप्पो एफ १५ या मॉडेलमध्ये ६.४ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. यावर इन-डिस्प्ले या प्रकारातील फिंगरप्रिंट स्कॅनर आणि वॉटरड्रॉप नॉच दिलेला आहे. यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ५ चे संरक्षक आवरणदेखील दिलेले आहे. या मीडियाटेकचा हेलीओ पी ७० हा प्रोसेसर आहे. याची रॅम ८ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी असून ते वाढविता येणार आहे. फास्ट चार्जींग तंत्रज्ञानाने युक्त असणारी यातील बॅटरी ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइड पाय आवृत्तीपासून विकसित केलेल्या कलरओएस ६.१ या प्रणालीवर चालणारा आहे.

ओप्पो एफ १५ स्मार्टफोनचे मूल्य १९,९९० रूपये असून याची अमेझॉन इंडिया आणि फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून नोंदणी सुरू करण्यात आली आहे. हे मॉडेल प्रत्यक्षात २४ जानेवारीपासून ग्राहकांना मिळणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here