ओप्पोचा ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेजयुक्त स्मार्टफोन !

    0

    ओप्पोने तब्बल ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेज असणारा ए ९ २०२० व्हॅनिला मिंट एडिशन हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर केला आहे.

    यंदाच्या जुलै महिन्यात ओप्पो ए९ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आला होता. यानंतर ओप्पो ए९ २०२० ही याचीच पुढील आवृत्ती मरीन ग्रीन, स्पेस पर्पल आणि व्हाईट टील या तीन रंगाच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आली होती. आता याच स्मार्टफोनची व्हॅनिला मिंट एडिशन सादर करण्यात आली आहे. याचे मूल्य १९,९९० रूपये असून ग्राहक याला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पर्यायांमध्ये खरेदी करू शकतो.

    ओप्पो ए९ २०२०च्या व्हॅनिला मिंट आवृत्तीमध्ये या मॉडेलमध्ये ६.५३ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजे २३४० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा एलसीडी डिस्प्ले दिलेला आहे. यावर वॉटरड्रॉप या प्रकारातील नॉच दिलेला असून संरक्षणासाठी कॉर्नींग गोरीला ग्लास ५ चे संरक्षण आवरण प्रदान करण्यात आले आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ६६५ हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ८ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड पाय आवृत्तीपासून विकसित करण्यात आलेल्या कलर ओएस ६.० या प्रणालीवर चालणारा आहे. तर यातील बॅटरी ५,००० मिलीअँपिअर क्षमतेची आहे.

    ओप्पो ए ९ २०२० व्हॅनिला मिंट एडिशनच्या मागील बाजूस चार कॅमेर्‍यांचा सेटअप दिलेला असून यात ४८, २, २ आणि ८ मेगापिक्सल्सच्या चार कॅमेर्‍यांचा समावेश आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात १६ मेगापिक्सल्स क्षमतेचा कॅमेरा दिलेला आहे. यात डॉल्बी अ‍ॅटमॉसयुक्त अतिशय दर्जेदार ध्वनी प्रणाली आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here