ओप्पो आर १७ प्रो : ट्रिपल रिअल कॅमेर्‍यांसह उत्तमोत्तम फिचर्स

0

ओप्पो कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपला आर १७ प्रो हा नवीन स्मार्टफोन लाँच केला असून यात ट्रिपल रिअर कॅमेर्‍यांसह अनेक उत्तमोत्तम फिचर्स आहेत.

गत अनेक दिवसांपासून ओप्पो आर १७ प्रो या मॉडेलबाबत उत्सुकतेचा वातावरण निर्मित झाले होते. या पार्श्‍वभूमिवर, आता हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आला आहे. ओप्पो आर१७ प्रो या मॉडेलमध्ये ६.४ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजे २२८० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ७१० हा प्रोसेसर दिला आहे. याची रॅम ८ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. विशेष बाब म्हणजे यात अलीकडच्या काळातल्या काही उच्च श्रेणीतील स्मार्टफोनमध्ये देण्यात येणारे इन-डिस्प्ले फिंचरप्रिंट स्कॅनर हे विशेष फिचरदेखील प्रदान करण्यात आले आहे.

वर नमूद केल्यानुसार ओप्पो आर १७ प्रो या मॉडेलच्या मागील बाजूस ट्रिपल रिअर कॅमेर्‍यांचा सेटअप दिलेला आहे. यात १२ व २० मेगापिक्सल्सच्या ड्युअल कॅमेर्‍यांना टिओएफ थ्रीडी स्टीरिओ कॅमेर्‍याची जोड देण्यात आलेली आहे. याच्या मदतीने थ्रीडी प्रतिमा घेता येणार आहेत. तर यातील फ्रंट कॅमेरा तब्बल २५ मेगापिक्सल्सचा असणार आहे. यातदेखील थ्रीडी पोटेर्र्ट मोड देण्यात आलेला आहे. यातील बॅटरी ३,६५० मिलीअँपिअर क्षमतेची असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरियो ८.१ या आवृत्तीवर आधारित कलरओएस ५.१ या प्रणालीवर चालणारा आहे.

ओप्पो आर १७ प्रो या मॉडेलमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात एनएफसीसह अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. या स्मार्टफोनचे मूल्य ४५,९९० रूपये असून ग्राहक याला अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करू शकणार आहेत. हे मॉडेल रॅडियंट मिस्ट आणि एमरेल्ड ग्रीन या दोन रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here