पॅनासोनिकच्या ‘या’ कॅमेर्‍यात होणार ६-के क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण

0

पॅनासोनिकने तब्बल ६-के क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यास सक्षम असणारा ल्युमिक्स एस१एच हा कॅमेरा भारतीय ग्राहकांना सादर केला आहे.

अलीकडच्या काळात फोर-के क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे. यातच आता याच्याही पलीकडचे अर्थात सिक्स वा एट के क्षमतेकडे वाटचाल सुरू झालेली आहे. या पार्श्‍वभूमिवर, पॅनासोनिक ल्युमिक्स एस१एच हा फुल फ्रेम मिररलेस कॅमेरा बाजारपेठेत सादर करण्यात आलेला आहे. याचे मूल्य ३,१९,९९० रूपये असून देशभरातील पॅनासोनिकच्या शोरूम्समधून याला उपलब्ध करण्यात आलेले आहे. याची खासियत म्हणजे यात २४ फ्रेम्स प्रति सेकंद इतक्या गतीने ६-के क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण करता येणार आहे. तसेच याच्या मदतीने फोर-के, फुल एचडी, स्लो मोशन या प्रकारातील चलचित्रीकरणही करता येईल. यात मायक्रोफोनचे अ‍ॅडाप्टरदेखील प्रदान करण्यात आलेले आहे.

पॅनासोनिक ल्युमिक्स एस१एच या मॉडेलमध्ये २४.२ मेगापिक्सल्स क्षमतेचे सीएमओएस सेन्सर दिलेले आहे. यात ५-अ‍ॅक्सीस बॉडी स्टॅबिलायझेशन आणि २ अ‍ॅक्सीस ऑप्टीकल स्टॅबिलायझेशन प्रदान करण्यात आले आहे. यात ड्युअल नेटीव्ह आयएसओ तंत्रज्ञानाचा वापर केला असल्याने अतिशय स्पष्ट प्रतिमा घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. ड्युअल मेमरी कार्ड स्लॉटमुळे यात एकाच वेळेस दोन मेमरी कार्ड वापरता येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here