पॅनासोनिक एल्युगा रे ८१० स्मार्टफोन दाखल

0

पॅनासोनिकने भारतीय ग्राहकांसाठी एल्युगा रे ८१० हा स्मार्टफोन लाँच केला असून यात फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे.

पॅनासोनिक कंपनीने दीर्घ काळानंतर भारतीय ग्राहकांसाठी एल्युगा रे ८१० हे मॉडेल सादर केले आहे. याचे मूल्य १६,९९० रूपये असून ग्राहक याला फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून स्टारी ब्लॅक आणि टर्कीश ब्ल्यू या दोन रंगाच्या पर्यायात खरेदी करू शकणार आहेत. हे मॉडेल मिड-रेंज या प्रकारातील असून खरं तर या सेगमेंटमध्ये अनेक उत्तमोत्त पर्याय असल्याने हे मॉडेल आपले स्थान निर्माण करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पॅनासोनिक एल्युगा रे ८१० या मॉडेलमध्ये ६.१९ इंच आकारमानाचा व एचडी प्लस ( १५०० बाय ७२० पिक्सल्स ) क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले असून यावर आयफोन-१० प्रमाणे नॉच प्रदान करण्यात आलेला आहे. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेर्‍यांचा सेटअप असून यातील प्रमुख कॅमेरा १६ तर दुसरा कॅमेरा २ मेगापिक्सल्सचा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात १६ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा दिलेला आहे. या स्मार्टफोनमध्ये ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीवर चालणारे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here