पेटीएम फर्स्ट लॉयल्टी प्रोग्रॅमला प्रारंभ

0

पेटीएमने आपल्या ग्राहकांसाठी पेटीएम फर्स्ट ही योजना जाहीर केली असून याच्या माध्यमातून युजर्सला विविध लाभ देण्यात येणार आहेत.

पेटीएम फर्स्ट हा लॉयल्टे बेस्ड प्रोग्रॅम आहे. यासाठी ग्राहकाला दर वर्षाला ७५० रूपये भरावे लागणार आहेत. अर्थात, याच्या बदल्यात त्यांना बरेच काही मिळणार आहे. याच्या अंतर्गत युजरला प्रत्येक महिन्याला एका चित्रपटाच्या तिकिटावर १०० रूपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. याशिवाय, पेटीएमने तब्बल १२ हजारांपर्यंतच्या ब्रँडसोबत सहकार्याचे करार केले असून यातून ग्राहकाला लाभ मिळणार आहे. पेटीएमने झोमॅटो या फुड डिलीव्हरीच्या क्षेत्रातील कंपनीशी करार केला असून यामुळे ग्राहकाला झोमॅटो गोल्डचे सदस्यत्व मिळणार आहे. याशिवाय, गाना, सोनी लिव्ह आणि इरॉस नाऊ यांचे वार्षिक सदस्यत्वदेखील त्याला मोफत मिळणार आहे. तर उबर आणि उबर इटस्च्या सेवांमध्येही संबंधीत युजरला सवलत मिळणार आहे. अर्थात, ७५० रूपयांच्या बदल्यात ग्राहकाचा विविध मार्गांनी मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. यामुळे हा लॉयल्ट्री प्रोग्रॅम ग्राहकांच्या पसंतीस उतरण्याची शक्यता आहे.

पेटीएम फर्स्टच्या माध्यमातून अमेझॉन प्राईम सेवेला टक्कर देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here