पेटीएमवर लवकरच बातम्या, लाईव्ह व्हिडीओ आणि बरेच काही !

0

पेटीएम या डिजीटल पेमेंट प्रणालीवर लवकरच बातम्यांसह लाईव्ह व्हिडीओ आणि अन्य फिचर्स येणार असल्याची माहिती कंपनीतर्फे देण्यात आलेली आहे.

भारतात डिजीटल पेमेंट प्रणालीमध्ये पेटीएम अग्रेसर आहे. आता पैशांच्या व्यवहाराच्या पलीकडे जाऊन युजर्सला विविध सुविधा प्रदान करण्यासाठी व विशेष करून युजर्सची एंगेजमेंट वाढविण्यासाठी नवनवीन सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक अबोट यांनी दिली आहे. ते म्हणाले की, साधारणपणे पुढील महिन्याच्या प्रारंभी युजर्सला विविध नाविन्यपूर्ण सेवा प्रदान करण्यात येणार आहेत. याच्या अंतर्गत ख्यातप्राप्त पब्लीशर्सचे कंटेंट हे प्रमुख असेल. यात बातम्या, विविध घटनांचे लाईव्ह व्हिडीओज, दूरचित्रवाणी कार्यक्रम आदींचा समावेश असणार आहे.

पेटीएमने काही महिन्यांपूर्वीच शाओमी, विवो आणि ओप्पो आदींसारख्या कंपन्यांसोबत सहकार्याचा करार केलेला आहे. यामुळे या स्मार्टफोनच्या मॉडेल्समध्ये पेटीएम अ‍ॅप प्रिलोडेड अवस्थेत येणार आहे. या तिन्ही कंपन्या भारतीय बाजारपेठेत खूप लोकप्रिय असल्यामुळे साहजीकच याचा पेटीएमच्या युजर्स वाढीसाठी उपयोग होणार आहे. सध्या पेटीएमचे २७ कोटी नियमित युजर्स असून यात सहा ते सात कोटी युजर्सची वाढ अपेक्षित आहे. यासाठी युजर्सची एंगेजमेंट महत्वाची असल्यामुळे कंटेंटची सुविधा प्रदान करण्यात येणार असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, पेटीएमने आता आपल्या युजर्ससाठी युपीआय प्रणालीवर आधारित कोणत्याही पेमेंट सिस्टीमचा क्युआर कोड स्कॅन करून व्यवहार करण्याची सुुविधा प्रदान केली आहे. यामुळे आता युजर अन्य सेवांसाठीही पेमेंट करू शकणार आहे. गुगल पे या प्रणालीवर हे फिचर आधीच होते. आता पेटीएमनेही याला सादर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here