पोर्ट्रानिक्सचा ब्ल्यु-टुथ स्पीकरयुक्त एलईडी लँप

0

पोर्ट्रानिक्स कंपनीने इनबिल्ट ब्ल्यु-टुथ स्पीकर असणारा आयलुमी हा स्मार्ट एलईडी लँप भारतीय ग्राहकांना सादर केला आहे.

सध्या ब्ल्यु-टुथ स्पीकर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेले आहेत. यातच याला नाविन्यपूर्ण अवस्थेत सादर करण्यावर काही कंपन्यांनी भर दिला आहे. यात आता पोर्ट्रानिक्सने आयलुमी या नावाने ब्ल्यु-टुथ स्पीकर आणि स्मार्ट लँपचा मिलाफ असणारे मॉडेल ग्राहकांना सादर केले आहे. याचे मूल्य २,९९० रूपये असून याला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. यात ३ वॅट क्षमतेचे स्पीकर लावण्यात आले असून यात असणार्‍या मायक्रोफोनच्या मदतीने संलग्न करण्यात आलेल्या स्मार्टफोनवरील कॉल रिसिव्ह करता येणार आहे. तर या दोन वॅट क्षमतेच्या एलईडी लँपमध्ये पाच प्रकारे प्रकाशाची तीव्रता बदलता येणार आहे. तर याच्या वरील भागावर टिचकी मारून लँपचा रंग बदलता येणार आहे. यात इंद्रधनुष्यातील सर्व रंग उपलब्ध आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे संगीत सुरू असतांना याच्या तालावर लाईट चालू-बंद होत असल्याचे ते दिसण्यासाठी अतिशय आकर्षक वाटते असे कंपनीने नमूद केले आहे.

आयलुमी हे मॉडेल अतिशय टणक आणि दर्जेदार अशा प्लास्टीकपासून तयार करण्यात आले असून ते ने-आण करण्यासाठी अतिशय सुलभ आहे. यात २,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. ती चांगला बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here