‘विवो व्ही १५ प्रो’च्या ‘या’ आवृत्तीच्या मूल्यात घट

0

विवो कंपनीने आपल्या व्ही १५ प्रो या मॉडेलच्या ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेजयुक्त मॉडेलच्या मूल्यात तीन हजार रूपयांची कपात केली आहे.

विवो व्ही १५ प्रो हे मॉडेल २६,९९० रूपये मूल्यात लाँच करण्यात आले होते. याचे मूल्य आता तीन हजारांनी कमी करण्यात आले असून ग्राहक याला २३,९९० रूपयात खरेदी करू शकणार आहे. मूल्यातील ही घट ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये करण्यात आलेली आहे.

विवो व्ही १५ प्रो या मॉडेलमध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेर्‍यांचा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा ४८ मेगापिक्सल्सचा असून याला ८ आणि ५ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍यांची जोड दिलेली आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ३२ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. ड्युअल इंजिन फास्ट चार्जींग तंत्रज्ञानाने युक्त असणारी यातील बॅटरी ३७०० मिलीअँपिअर क्षमतेची आहे.

विवो व्ही १५ प्रो या मॉडेलमध्ये ६.३९ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस क्षमतेचा सुपर अमोलेड या प्रकारातील डिस्प्ले दिलेला आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ७७५ हा प्रोसेसर आहे. याची रॅम ८ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी इतके आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीवर चालणारे असून यावर कंपनीचा फनटच हा युजर इंटरफेस दिलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here