टिकटॉकच्या उत्पन्नात घसघशीत वाढ

0

टिकटॉक या शॉर्ट व्हिडीओ शेअरिंग अ‍ॅपच्या उत्पन्नात अल्पावधीत प्रचंड गतीने वाढ झाल्याचे ताज्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

सायबरविश्‍वातील अ‍ॅप्सचे युजर्स आणि यातून आलेल्या उत्पन्नाचे विश्‍लेषण करणार्‍या विविध संस्थांनी गत वर्षाच्या अखेरच्या तिमाहीची अर्थात ऑक्टोबर ते डिसेंबर-२०१९ या कालखंडातील आकडेवारी जाहीर केली आहे. यात टिकटॉक या अ‍ॅपच्या उत्पन्नात झालेली वाढ ही अतिशय लक्षणीय असल्याचे दिसून आले आहे. या तिमाहीत टिकटॉकने पाच कोटी डॉलर्सचे उत्पन्न मिळवले आहे. खरं तर या अ‍ॅपच्या वापरकर्त्यांची अजस्त्र संख्या पाहता हा आकडा खूप कमी आहे. तथापि, गत तिमाहींचा विचार केला असता टिकटॉकने एका तिमाहीत तब्बल ३१० टक्क्यांनी वाढ नोंदवली असल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे. २०१९च्या पहिल्या तिमाहीत फक्त एक कोटी डॉलर्स उत्पन्न असणार्‍या टिकटॉकने अखेरच्या तिमाहीत याच्या पाच पटीने उत्पन्न मिळवले असून यात या वर्षात भर पडणार असल्याचे संकेत आता मिळाले आहेत.

टिकटॉकवर गोपनीयतेचा भंग केल्याच्या अनेकदा तक्रारी करण्यात आल्या असल्या तरी अतिशय प्रचंड गतीने या अ‍ॅपची लोकप्रियता वाढत आहे. यासोबत या अ‍ॅपवर आता जाहिरातींचे प्रमाणदेखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक सेलिब्रिटी टिकटॉकशी कनेक्ट होत असल्याने याचे वलयदेखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. यामुळे यावरील जाहिरातीदेखील वाढणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मध्यंतरी टिकटॉकने आपल्या युजर्ससाठी व्हिडीओसोबत थर्ड पार्टी लिंक टाकण्याची सुविधा दिली असून याच प्रमाणे अन्य फिचर्स लवकर देण्यात येणार असल्याचे संकेतदेखील आता मिळाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here