संगणकासाठी पबजी लाईट आवृत्ती सादर

0
पबजी गेम, pubg game

पबजी मोबाईल या गेमची संगणकासाठीची लाईट आवृत्ती भारतीय युजर्ससाठी सादर करण्यात आली असून याला मोफत उपलब्ध करण्यात आले आहे.

टेनसेंट गेम्स या चिनी कंपनीची मालकी असणार्‍या पबजी मोबाईल या गेमने जगभरातील तरूणाईला अक्षरश: वेड लावले आहे. आधीपासूनच हा गेम संगणकावर खेळण्यासाठी उपलब्ध होता. तथापि, यासाठी हायर कॉन्फीग्युरेशन असणारे कंप्युटर आवश्यक होते. नेमकी ही बाब लक्षात घेत, टेनसेंट गेमने काही महिन्यांपूर्वीच डेस्कटॉपसाठी लाईट आवृत्ती प्रदर्शीत केली होती. याला काही देशांमध्ये लाँचदेखील करण्यात आले होते. आता हीच आवृत्ती आता भारतीय युजर्ससाठी सादर करण्यात आली आहे.

नावातच नमूद असल्यानुसार पबजी लाईट आवृत्ती ही मध्यम किंमतपट्टयातील संगणक अथवा लॅपटॉपसाठी अतिशय उपयुक्त आहे. यासाठी किमान कोअर आय ३ प्रोसेसर, ४ जीबी रॅम व इंटेलचा ग्राफीक प्रोसेसर असणे आवश्यक आहे. यापेक्षा उच्च प्रोसेसर असल्यास उत्तम. पबजी लाईटचे अ‍ॅप संगणक अथवा लॅपटॉपवरून इन्स्टॉल करून कुणीही या गेमचा आनंद घेऊ शकणार आहे. हा गेम मोफत उपलब्ध करण्यात आला आहे. येत्या काही दिवसांमध्ये ही आवृत्ती भारतीय युजर्सला इन्स्टॉल करण्यासाठी उपलब्ध होणार असल्याचे टेनसेंट गेम्सने जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here