आता पबजी मोबाईल गेमवर झोंबी मोड

0
पबजी गेम, pubg game

पबजी मोबाईल या गेमवर आता ‘झोंबी : सव्हाईव्ह टिल डॉन’ हा नवीन मोड प्रदान करण्यात आल्याचे घोषीत करण्यात आले आहे.

पबजी मोबाईल गेमला विकसित करणार्‍या टेनसेंट कंपनीने यात आता झोंबी : सर्व्हाईव्ह टिल डॉन हा नवीन मोड देण्याची घोषणा केली आहे. हा मोड ‘रेसिडंट एव्हील २’ या ख्यातप्राप्त गेममधील पात्रांवर आधारित आहे. याला मेन मेन्यूमधून अ‍ॅक्टीव्हेट करता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. या माध्यमातून साधारणपणे ३० मिनिटांपर्यंत खेळता येणार आहे. यामध्ये पोलीस, टारयंट, लायकर, जी१ आदी झोंबींचे विविध प्रकार देण्यात आले आहेत.

दरम्यान, एकीकडे पबजी मोबाईल गेमची लोकप्रियता वाढत असतांना दुसरीकडे याचे विद्यार्थ्यांना व्यसन जडल्याचा आरोप करून यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. विशेष करून भारतात याला विरोध होऊ लागला आहे. यामुळे टेनसेंट कंपनीने एका निवेदनाच्या माध्यमातून आपण याबाबत काळजी घेणार असल्याची ग्वाही दिली आहे. पबजी गेमच्या अ‍ॅडक्टीव्ह स्वरूपात बदल करण्यात येईल असेही कंपनीने नमूद केले आहे. कुणीही याला अतिशय सुरक्षीतपणे खेळू शकेल अशी इको-सिस्टीम यात देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here