पबजी मोबाईल गेम झाला एक वर्षाचा : नवीन फिचर्सचा समावेश

0
पबजी गेम, pubg game

तरूणाईला वेड लावणारा पबजी मोबाईल गेम एक वर्षाचा झाला असून यानिमित्त गेमर्ससाठी एका अपडेटच्या माध्यमातून नवीन फिचर्स देण्यात आले आहेत.

टेनसेंट गेम्स या कंपनीची मालकी असणार्‍या पबजी मोबाईल या गेमला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या अल्प कालखंडातच पबजीने जगभरात अक्षरश: धुमाकुळ घातला आहे. एकीकडे तरूणाईने या गेमला अक्षरश: वेड लावले आहे. याचे अनेकांना अक्षरश: व्यसन जडल्याचे दिसून येत आहे. यामुळे गुजरात राज्यात यावर अधिकृतपणे बंदी घालण्यात आली आहे. तर देशातील अन्य राज्यांमध्येही अनेक संघटनांनी यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. अर्थात, एकीकडे याविरूध्द वातावरण तापत असले तरी या गेमची लोकप्रियता प्रचंड वेगाने वाढत आहे. १९ मार्च रोजी हा गेम अधिकृतपणे एक वर्षाचा झाला. याचे औचित्य साधून टेनसेंट गेमने यात नवीन फिचर्सचा समावेश करण्याची घोषणा केली आहे. याला अपडेटच्या माध्यमातून प्रदान करण्यात येणार आहे. याच्या आधीच पहिल्या अ‍ॅनिव्हर्सरीनिमित्त युजर्सला शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यांना बर्थडे पार्टी सेलिब्रेट करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

पबजी गेमच्या युजर्ससाठी नवीन वेपन्स देण्यात आले आहेत. यामध्ये विकेंडी एक्सक्लुझीव्ह जी३६सी रायफलचा समावेश आहे. याशिवाय, युजरला तुकसाई ही तीनचाकी रिक्षादेखील वापरता येणार आहे. या अपडेटची सर्वात लक्षणीय बाब म्हणजे पबजी मोबाईलसाठी लवकरच प्राईम आणि प्राईम प्लस या दोन प्रकारच्या सबस्क्रीप्शन्स येणार असल्याचे सूतोवाच यात करण्यात आले आहे. अर्थात अ‍ॅडव्हान्स लेव्हलवर पबजी खेळण्यासाठी लवकरच पैसे मोजावे लागणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here