पबजी मोबाईल गेमचे ताजे अपडेट सादर

0
पबजी मोबाईल, pubg mobile

पबजी मोबाईल गेमची ताजी बीटा आवृत्ती अँड्रॉइड व आयओएस युजर्ससाठी सादर करण्यात आली असून यामध्ये काही नवीन फिचर्स समाविष्ट करण्यात आले आहेत.

जगभरात सध्या पबजी गेमने युजर्सला वेड लावले आहे. विशेष करून तरूणाई याच्या आकंठ प्रेमात असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमिवर, आपल्या युजर्ससाठी या गेमला सादर करणार्‍या टेनसेंट कंपनीने नवनवीन फिचर्स देण्याचा सपाटा लावला आहे. या अनुषंगाने पबजी मोबाईल गेमची ०.१०.० ही प्रयोगात्मक म्हणजेच बीटा आवृत्ती नुकतीच सादर करण्यात आली आहे. अँड्रॉइड व आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी अपडेटच्या माध्यमातून याला उपलब्ध करण्यात आले आहे. यात अनेक नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये एमके४७ म्युटंट ही रायफल वापरण्याची सुविधा युजर्सला मिळणार आहे. याआधी ही रायफल संगणक आणि एक्सबॉक्स वन यावरून पबजी वापरणार्‍यांना मिळाली होती. अर्थात, स्मार्टफोन युजर्सलादेखील ही रायफल वापरता येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यात मल्टीपल फायर मोड आणि २० बुलेट क्लिपची सुविधा मिळणार आहे.

याशिवाय, ताज्या अपडेटमध्ये लेसर साईट अटॅचमेंट हे नवीन फिचरदेखील युजर्ससाठी सादर करण्यात आले आहे. याच्या अंतर्गत युजरला रात्री नेव्हीगेशन करतांना अगदी अचूक अशा नेव्हीगेशनसाठी मदत होणार आहे. याशिवाय, युजर्सला नवीन प्रिसेटचा उपयोग करून लेआऊट अ‍ॅडजस्ट करता येणार आहे. याच्या जोडीला चॅटींगचा अतिरिक्त पर्यायदेखील प्रदान करण्यात आला आहे. वर नमूद केल्यानुसार हे फिचर्स पबजी गेमच्या बीटा आवृत्ती वापरणार्‍या युजर्सला देण्यात आले आहेत. येत्या काही आठवड्यांमध्ये सर्व युजर्ससाठी हे अपडेट सादर करण्यात येईल असे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here