पबजी मोबाईल गेमचे अपडेट : नवीन फिचर्सचा समावेश

0
पबजी गेम, pubg game

तुफान लोकप्रिय झालेल्या पबजी मोबाईल गेमची नवीन आवृत्ती सादर करण्यात आली असून यामध्ये अतिशय भन्नाट फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

पबजी मोबाईल या गेमने तरूणाईला अक्षरश: वेड लावले आहे. या गेमची ०.१०.० ही नवीन आवृत्ती आता उपलब्ध करण्यात आली आहे. यात अनेक नवीन फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यातील सर्वात लक्षवेधी फिचर म्हणजे विकेंडी स्नो मॅपचा सपोर्ट होय. या क्षेत्राच्या अंतर्गत गेमर्स बर्फाळ भागातील लढाईचा आनंद घेऊ शकणार आहेत. यासाठी गेमर्सला नवीन आयुधे तसेच वाहने देण्यात आलेली आहेत. तसेच ताज्या अपडेटमध्ये काही नवीन फिचर्स समाविष्ट करण्यात आले आहेत.

पबजी मोबाईलने २० कोटी डाऊनलोडचा महत्वाचा टप्पा नुकताच पार केला आहे. या गेमला दररोज सुमारे तीन कोटी गेमर्स खेळत असल्याची माहितीसुध्दा कंपनीतर्फे जाहीर करण्यात आलेली आहे. या आकडेवारीत चीनमधील गेमर्सचा समावेश करण्यात आला नसल्याची बाब लक्षणीय आहे. याचा विचार केला असता पबजी मोबाईल आता जगभरात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाल्याचे दिसून येत आहे. यातच गेमर्सला आकर्षीत करण्यासाठी ठाराविक कालावधीनंतर नवनवीन फिचर्सचा समावेश करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here