फ्लिपकार्टवर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन सेल

0
फ्लिपकार्ट, flipkart

फ्लिपकार्टवर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन सेल सुरू झाला असून यात संबंधीत प्रोसेसर्सने सज्ज असणार्‍या विविध मॉडेल्सवर सवलती देण्यात येत आहेत.

फ्लिपकार्टवर ३१ मार्चपर्यंत क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन सेल सुरू राहणार आहे. क्वॉलकॉम कंपनीच्या स्नॅपड्रॅगन या मालिकेतील विविध प्रोसेसर्स हे बहुतांश स्मार्टफोन्समध्ये वापरले जातात. यातील निवडक मॉडेल्सवर फ्लिपकार्टच्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन सेलमध्ये सवलती देण्यात येत आहेत. यामध्ये पोको एफ१, रिअलमी २ प्रो, असुस झेनफोन ५ झेड, मोटोरोला वन पॉवर, रेडमी नोट ६ प्रो, विवो व्ही ११ आदींसह अन्य मॉडेल्सचा समावेश आहे.

यातील पोको एफ१ प्रो या मॉडेलवर तब्बल दोन हजारांची सवलत देण्यात आली आहे. यामुळे आता हा स्मार्टफोन ग्राहकांना १७,९९९ रूपयात खरेदी करता येणार आहे. विवो व्ही ११ प्रो या मॉडेलवरही दोन हजारांची सवलत जाहीर करण्यात आली आहे. तर रिअलमी २ प्रो या मॉडेलच्या एक जीबी रॅमयुक्त व्हेरियंटवरही एक हजार रूपयांची सवलत देण्यात आली आहे. असुसच्या झेनफोन मॅक्स प्रो एम १ या मॉडेलला ७,९९९ रूपये या सवलतीच्या मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहे. तर मॅक्स एम १ हा स्मार्टफोन एक हजाराच्या कपातीनंतर ६,४९९ रूपयात मिळणार आहे. याशिवाय मोटोरोला वन पॉवर हे मॉडेल १३,९९९ तर नोकिया ६.१ प्लस हे मॉडेलही इतक्याच मूल्यात खरेदी करता येणार आहे. तर असुसचा झेनफोन झेड ५ हा स्मार्टफोन २४९९९ रूपयात मिळणार आहे. दरम्यान, या सेलमध्ये नो-कॉस्ट इएमआय तसेच निवडक कार्डच्या खरेदीवर कॅशबॅकची सुविधादेखील देण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here