रिअलमीचा अँड्रॉइड स्मार्ट टिव्ही दाखल

0

रिअलमीने भारतीय ग्राहकांसाठी अँड्रॉइड प्रणालीवर चालणारा स्मार्ट टिव्ही ३२ आणि ४३ इंच आकारमानांमध्ये उपलब्ध केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ओप्पोची उपकंपनी असणारी रिअलमी कंपनी भारतीय बाजरपेठेत स्मार्ट टिव्ही सादर करणार असल्याची चर्चा सुरू होती. यावर शिक्कोमोर्तब झाले असून आज रिअलमीने स्मार्ट टिव्ही सादर केले आहेत. याला ३२ इंच आणि ४३ इंच आकारमानांमध्ये लाँच करण्यात आले असून यांचे मूल्य अनुक्रमे १२,९९९ आणि २१,९९९ रूपये आहे. ग्राहक याला रिअलमीच्या संकेतस्थळासह फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी शकणार आहेत. लवकरच याला देशभरातील शॉपीजमधून उपलब्ध करण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

या दोन्ही मॉडेलमधील बहुतांश फिचर्स समान आहेत. यातील ३२ इंची टिव्ही हा १३६६ बाय ७६८ पिक्सल्स म्हणजेच एचडी रेडी क्षमतेचा आहे. तर ४३ इंची टिव्ही हा १९२० बाय १०८० पिक्सल्स म्हणजेच फुल एचडी क्षमतेचा आहे. दोन्हींमध्ये एचडीआर १० तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला असून यामुळे यावर अगदी जीवंत चित्रांची अनुभूती घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. हे मॉडेल्स अँड्रॉइड ९ पाय या प्रणालीवर चालणारे असून यावर स्वतंत्र गुगल प्ले देण्यात आलेले आहे. यावरून कुणीही आपल्याला हवे असणारे अ‍ॅप इन्स्टॉल करून वापरू शकतो. तर या टिव्हींमध्ये अमेझॉन प्राईम, युट्युब, नेटफ्लिक्स आदी अ‍ॅप्स प्रिलोडेड अवस्थेत प्रदान करण्यात आले आहेत. यात मीडियाटेकचा एमएसडी ६६८३ हा प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम १ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी इतके प्रदान करण्यात आले आहे. यात डॉल्बी ऑडिओचा सपोर्ट युक्त २४ वॅट क्षमता असणारे चार स्पीकर्स दिलेले असून याच्या मदतीने अतिशय सुश्राव्य ध्वनीची अनुभूती घेता येणार आहे. तर यात ब्ल्यु-टुथची कनेक्टीव्हिटी देखील दिलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here