रिअलमीचा १२ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोअरेजयुक्त स्मार्टफोन

0

रिअलमीने रिअलमी एक्स२ प्रो हा स्मार्टफोन आज भारतात लाँच केला असून यातील एका व्हेरियंटची रॅम १२ जीबी व २५६ जीबी इतके आहे.

रिलअमी एक्स२ प्रो हा प्रिमीयम अर्थात उच्च श्रेणीतील स्मार्टफोन असून यात एकापेक्षा एक सरस फिचर्सचा समावेश आहे. यात ६.५ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस डिस्प्ले असून यावर संरक्षणासाठी कॉर्नींग गोरीला ग्लास ५ चे संरक्षक आवरण प्रदान करण्यात आले आहे. यात क्वॉलकॉमचा अतिशय वेगवान असा ८५५+ हा प्रोसेसर दिलेला आहे. याचे दोन व्हेरियंट सादर करण्यात आले असून एकात ८ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज तर दुसर्‍यात १२ जीबी रॅम असून इनबिल्ट स्टोअरेज २५६ जीबी इतके देण्यात आलेले आहे. यामध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉसने सज्ज असणारी अतिशय दर्जेदार ध्वनी प्रणाली दिलेली आहे.

रिअलमी एक्स२ प्रो या मॉडेलच्या मागील बाजूस क्वॉड अर्थात चार कॅमेर्‍यांचा सेटअप दिलेला आहे. यातील मुख्य कॅमेरा ६४ मेगापिक्सल्सचा असून यात सॅमसंगचे जीडब्ल्यू१ हे सेन्सर दिलेले आहे. याच्या जोडीला १३ मेगापिक्सल्सचा टेलीफोटो लेन्स असून याच्या मदतीने २एक्स ऑप्टीकल झूम आणि २० एक्स डिजीटल झूमची सुविधा मिळेल. तिसरा कॅमेरा हा वाईड अँगलने युक्त असून याची क्षमता ८ मेगापिक्सल्सची आहे. तर डेप्थ सेन्सरने युक्त असणारा चौथा कॅमेरा २ मेगापिक्सल्स क्षमतेचा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात १६ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. यातील बॅटरी ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची असून यासोबत ५० वॅट क्षमतेचे व्हिओओसी तंत्रज्ञानाने युक्त असणारे चार्जर दिलेले आहे. याच्या मदतीने ही बॅटरी फक्त ३५ मिनिटांमध्ये चार्ज होत असल्याचा कंपनीचा दावा आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या पाय आवृत्तीपासून विकसित करण्यात आलेल्या कलरओएस ६.१ या प्रणालीवर चालणारा आहे.

रिअलमी एक्स२ या स्मार्टफोनची ८ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज आणि १२ जीबी रॅम+२५६ जीबी स्टोअरेज या आवृत्त्या अनुक्रमे २९,९९० आणि ३३,९९० रूपये मूल्यात ग्राहकांना उपलब्ध करण्यात आल्या आहेत. याचा पहिला सेल २९ नोव्हेंबर रोजी होणार असून हे मॉडेल्स काँक्रीट आणि रेड ब्रिक्स या दोन रंगाच्या पर्यायात उपलब्ध करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here