आलाय तब्बल ६४ मेगापिक्सल्स क्षमतेच्या कॅमेर्‍याने सज्ज स्मार्टफोन !

0

तब्बल ६४ मेगापिक्सल्स क्षमतेच्या कॅमेर्‍याने सज्ज असणारा रिअलमी एक्सटी हा स्मार्टफोन आज तीन व्हेरियंटमध्ये भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात आला.

ओप्पीची मालकी असणार्‍या रिअलमीने आधीच ६४ मेगापिक्सल्स क्षमतेच्या कॅमेर्‍याने सज्ज असणारा स्मार्टफोन सादर करण्याचे संकेत दिले होते. यानुसार आज याच प्रकारचा कॅमेरा असणारा रिअलमी एक्सटी हा स्मार्टफोन सादर करण्यात आला. हे मॉडेल ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेज; ६ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेज आणि ८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेज अशा तीन व्हेरियंटच्या स्वरूपात अनुक्रमे १५,९९९; १६,९९९ आणि १८,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहेत. ग्राहक याला फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करू शकतात. यासोबत सहा महिन्यांपर्यंत स्क्रीन रिप्लेसमेंटची ऑफरदेखील देण्यात आलेली आहे.

वर नमूद केल्यानुसार या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे यातील दर्जेदार कॅमेरा होय. याच्या मागील बाजूस चार कॅमेर्‍यांचा सेटअप दिलेला आहे. यातील प्रमुख कॅमेरा ६४ मेगापिक्सल्सचा असून याला ८ मेगापिक्सल्सचा अल्ट्रा वाईड सेन्सर, २ मेगापिक्सल्सचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सल्सच्याच मॅक्रो लेन्सची जोड देण्यात आली आहे. या सर्व कॅमेर्‍यांच्या मदतीने अतिशय उत्तम दर्जाच्या प्रतिमा घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात १६ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, या स्मार्टफोनमध्ये ६.४ इंच आकारमानाचा सुपर अमोलेड डिस्प्ले दिलेला आहे. यावर ड्यु ड्रॉप या प्रकारातील नॉच आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर प्रदान करण्यात आले आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ७१२ हा गतीमान प्रोसेसर दिलेला आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या पुढील आणि मागील म्हणजेच दोन्ही बाजूला कॉर्निंग गोरीला ग्लास ५ चे संरक्षक आवरण देण्यात आले आहे. यातील बॅटरी ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची असून याला फास्ट चार्जींगचा सपोर्ट आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीवर चालणारे असून यावर कंपनीचा कलरओएस ६.० हा युजर इंटरफेस दिलेला आहे. हा स्मार्टफोन पर्ल व्हाईट आणि पर्ल ब्ल्यू या दोन रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here