दोन व्हेरियंटमध्ये मिळणार रिअलमी ३ प्रो स्मार्टफोन

0

ओप्पोच्या मालकीचा ब्रँड असणार्‍या रिअलमीने रिअलमी ३ प्रो हे मॉडेल भारतीय ग्राहकांना दोन व्हेरियंटमध्ये सादर केले असून यात दर्जेदार कॅमेर्‍यासह अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे.

रिअलमी ३ प्रो या मॉडेलबाबत प्रचंड औत्सुक्याचे वातावरण निर्मीत झाले होते. या अनुषंगाने आज दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात रिअलमी सी २ या मॉडेलसोबत रिअलमी ३ प्रो हा स्मार्टफोन सादर करण्यात आला. रिअलमीच्या आधीच्या मॉडेल्सनुसार यातही अत्यंत किफायतशीर मूल्यात अनेक उत्तमोत्तम फिचर्स देण्यात आलेले आहेत. यातील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे यातील कॅमेरा होय. याच्या मागील बाजूस १६ व ५ मेगापिक्सल्स क्षमतांचा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात तब्बल २५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आलेला आहे.

या स्मार्टफोनमधील अन्य फिचर्सचा विचार केला असता, यामध्ये ६.३ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस ( २३४० बाय १०८० पिक्सल्स ) क्षमतेचा डिस्प्ले असून यावर कॉर्नींग गोरीला ग्लास ५ चे संरक्षक आवरण प्रदान करण्यात आले आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ७१० हा प्रोसेसर दिलेला आहे. याच्या दोन व्हेरियंटची रॅम ४ व ६ जीबी असून स्टोअरेज अनुक्रमे ६४ आणि १२८ जीबी असे आहे. यांचे मूल्य १३,९९९ आणि १६,९९९ रूपये असून ग्राहकांना हे मॉडेल कंपनीच्या वेबसाईटसह फ्लिपकार्टवरून १५ मे पासून मिळणार आहे. यात व्हीओओसी ३.० तंत्रज्ञानाने युक्त असणारी ४०४५ मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे. तर हे मॉडेल अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीवर चालणारे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here