रिलायन्स जिओ फायबरच्या प्लॅन्सबाबत उत्सुकता

0

रिलायन्सची जिओ फायबर सेवा ५ सप्टेंबर रोजी सुरू होत असून यातील विविध प्लॅन्स नेमके कसे असतील याबाबत प्रचंड उत्सुकता लागली आहे.

गत महिन्यात झालेल्या रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी बहुप्रतिक्षित जिओ फायबर सेवा ही ५ सप्टेंबर रोजी अधिकृतपणे लाँच करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. यानुसार आता उद्या या सेवेस प्रारंभ होणार आहे. खरं तर, गत सुमारे एक वर्षांपासून ही सेवा चाचणीच्या स्वरूपात उपलब्ध आहे. तथापि, याच्या विविध प्लॅन्सबाबत अद्यापही माहिती समोर आलेली नाही. यात जिओ फायबर ब्रॉडबँड, जिओ सेट टॉप बॉक्स आणि जिओ पोस्ट पेड प्लॅन्सचा समावेश आहे. यातील सर्वात औत्सुक्याचा विषय हा अर्थातच जिओ फायबर हीच होय.

मुकेश अंबानी यांनी जिओ फायबरच्या विविध मासिक प्लॅन्सचे दर हे ७०० ते १० हजार रूपयांच्या दरम्यान असतील असे आधीच जाहीर केले आहेत. यातील बेसिक प्लॅनमध्ये १०० एमबीपीएस तर दहा हजाराच्या प्लॅनमध्ये तब्बल एक जीबीपीएस इतका स्पीड मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहेत. सर्वात उच्च प्लॅनसोबत कंपनी एचडी/फोर-के क्षमतेचा टिव्ही व फोर-के क्षमतेचा सेट टॉप बॉक्सदेखील देणार असल्याची घोषणादेखील आधीच करण्यात आलेली असून यात नेमक्या कोणत्या अटी-शर्ती असतील याबाबत युजर्सला कुतुहल आहे. तर यासोबत इंटरनेटसोबत मोफत लँडलाईन कॉलींगची सुविधा मिळणार असून अमेरिका व कॅनडात अमर्याद कॉलींगसाठी ५०० रूपये दरमहा हा प्लॅन सादर करण्यात आलेला आहे. आता या सर्व प्लॅन्समधील बारकावे हे उद्याच उलगडणार असल्यामुळे युजर्सची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here