रिलायन्स जिओचा व्हिडीओ कॉल असिस्टंट

0

रिलायन्स जिओने सध्या सुरू असणार्‍या इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये व्हिडीओ कॉल असिस्टंट सादर केला असून याच्या मदतीने कस्टमर केअर सेवेला नवीन आयाम मिळणार आहे.

सध्या नवी दिल्ली येथे इंडियन मोबाईल काँग्रेस सुरू आहे. याच्या पहिल्या दिवशी रिलायन्स जिओने दोन महत्वपूर्ण घोषणा केल्या. याच्या अंतर्गत आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स म्हणजेच कृत्रीम बुध्दीमत्तेने युक्त असणारा व्हिडीओ कॉल असिस्टंट आणि बॉट मेकर टुल सादर करण्यात आले आहे. यातील व्हिडीओ कॉल असिस्टंट हा लहान आणि मध्यम व्यावसायिकांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. विशेष करून याचा कस्टमर केअर सेवेसाठी उपयोग होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. यात ग्राहकाने संबंधीत कंपनीच्या क्रमांकावर फोर-जी नेटवर्कद्वारे व्हिडीओ कॉल केला असता हा कॉल असिस्टंट अ‍ॅक्टीव्ह होतो. यानंतर ग्राहकाने विचारलेल्या प्रश्‍नांना व्हिडीओच्याच माध्यमातून अ‍ॅटोमॅटीक अर्थात स्वयंचलीत पध्दतीत उत्तर दिले जाते. यात माहिती देणारा व्यक्ती हा अवतारच्या माध्यमातून कस्टमाईज्ड करण्याची सुविधादेखील प्रदान करण्यात आली आहे. यामुळे जणू काही समोर कंपनीचा कर्मचारी असल्याप्रमाणे ग्राहकांना प्रॉडक्ट वा सेवेची माहिती देण्यापासून ते त्यांच्या शंकांचे निरसन करण्याच्या जबाबदार्‍या यातून पार पाडता येणार आहेत. यामुळे अर्थातच कस्टमर केअरच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल घडतील असा दावा जिओतर्फे करण्यात आलेला आहे. हा व्हिडीओ कॉल बॉट भारतीय भाषांमध्येही वापरता येणार असल्याची बाब लक्षणीय आहे.

दरम्यान, याच कार्यक्रमात जिओने बॉट मेकर टुलदेखील सादर केले आहे. याच्या मदतीने कुणीही अतिशय सुलभ पध्दतीत चॅटबॉट वा अन्य प्रकारचे बॉट तयार करू शकतो. वर नमूद केल्यानुसार या दोन्ही सेवांमध्ये जिओने एआय म्हणजेच कृत्रीम बुध्दीमत्तेचा वापर केलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here