रेनो डस्टरची नवीन आवृत्ती दाखल : जाणून घ्या सर्व फिचर्स

0

रेनो कंपनीने आपली डस्टर २०१९ ही नवीन आवृत्ती भारतीय बाजारपेठेत सादर केली असून याचे आज अनावरण करण्यात आले.

रेनो कंपनी आपल्या डस्टरची फेसलीफ्ट अर्थात नवीन आवृत्ती भारतीय बाजारपेठेत सादर करणार असल्याची चर्चा कधीपासूनच सुरू होती. यावर आता शिक्कामोर्तब झाले असून आज कंपनीने एका शानदार कार्यक्रमात या मॉडेलचे अनावरण केले. याला पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही पर्यायांमध्ये सादर करण्यात आले असून हे मॉडेल पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. याचे एकूण नऊ व्हेरियंट ग्राहकांना सादर करण्यात आले आहेत. यातील पेट्रोल इंजिन हे १.५ लिटर क्षमतेचे असून यामध्ये ५ स्पीड मॅन्युअल आणि ६ स्पीड सीव्हीटी अ‍ॅटोमॅटीक गिआबॉक्सचे पर्याय दिलेले आहेत. तर यातील डिझेल इंजिन हे १.५ लीटर क्षमतेचे आणि फोर सिलेंडर या प्रकारातील असून यात दोन पॉवर आऊटपुट दिलेले आहे. यातही मॅन्युअल आणि सीव्हीटी हे दोन्ही पर्याय आहेत.

मूळ आवृत्तीपेक्षा नवीन डस्टरमध्ये अनेक नवीन फिचर्स दिलेले आहेत. यात प्रामुख्याने नवीन ग्रील, प्रोजेक्टर हेडलँप्स, एलईडी डे टाईम रनींग लँप्स, नवीन बोनट, नवीन डिझाईनयुक्त बंपर, नंबर प्लेटस् आदींचा समावेश करण्यात आला आहे. आतील भागाचा विचार केला असता, या मॉडेलमध्ये नवीन स्टीअरिंग दिलेले आहे. यात अ‍ॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटोचा सपोर्ट असणारी नवीन इन्फोटेनमेंट प्रणाली प्रदान करण्यात आली आहे. यात नवीन एसी व्हेंट दिलेले आहेत. सुरक्षेसाठी यात दोन एयरबॅग्ज दिलेल्या आहेत. यामध्ये ब्रेक असिस्ट आणि इबीडीयुक्त अँटी लॉक ब्रेकींग सिस्टीम आहे. तसेच काही व्हेरियंटमध्ये हिल असिस्ट हे फिचरदेखील दिलेले आहे.

नवीन रेनो डस्टरचे विविध व्हेरियंटस् आणि यांचे एक्स-शोरूम मुल्य पुढीलप्रमाणे आहे.

आरएक्सई पेट्रोल – ७.९९ लाख

आरएक्सएस पेट्रोल – ९.२० लाख

आरएक्सएस (ओ) पेट्रोल सीव्हीटी- ९.९९ लाख

८५पीएस डिझल आरएक्सई – ९.३० लाख

८५पीएस डिझल आरएक्सएस- ९.९९ लाख

११०पीएस डिझल आरएक्सएस- ११.२० लाख

११० पीएस डिझल आरएक्सझेड- १२.१० लाख

११० पीएस डिझल आरएक्सझेड एएमटी- १२.५० लाख

११० पीएस डिझेल आरएक्सएस एडब्ल्यूडी- १२.५० लाख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here