शाओमी ब्लॅक शार्क २ स्मार्टफोनच्या विक्रीस प्रारंभ

0

शाओमीच्या ब्लॅक शार्क २ या खास गेमर्ससाठी तयार करण्यात आलेल्या स्मार्टफोनच्या विक्रीस फ्लिपकार्टवरून प्रारंभ करण्यात आला आहे.

शाओमीने अलीकडेच भारतीय बाजारपेठेत ब्लॅक शार्क २ हे मॉडेल लाँच केले होते. आजपासून फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून या मॉडेलच्या विक्रीस प्रारंभ होणार आहे. याचे ६ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेजचे मॉडेल ३९,९९९ तर १२ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोअरेजचे व्हेरियंट ४९,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहे. यासोबत कंपनीने नो-कॉस्ट इएमआयची सुविधा दिली आहे. तर अ‍ॅक्सीस बँकच्या बझ क्रेडीट कार्डवरून याची खरेदी करणार्‍याला १० टक्के सवलत मिळणार आहे. हा स्मार्टफोन शॅडो ब्लॅक आणि फ्रोझन सिल्व्हर या दोन रंगाच्या पर्यायात उपलब्ध करण्यात आला आहे.

वर नमूद केल्यानुसार ब्लॅक शार्क २ या मॉडेलमध्ये खास गेमर्ससाठी विविध फिचर्स देण्यात आलेले आहेत. यात लिक्वीड कुल ३.० या कुलींग सिस्टीमचा समावेश आहे. यामुळे दीर्घ काळापर्यंत गेम्स खेळले तरी हा स्मार्टफोन तापणार नसल्याची माहिती कंपनीने दिली आहे. तर याच्या डिस्प्लेवर गेमींगचा उत्तम आनंद घेण्यासाठी गेमींग प्रेस तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, ब्लॅक शार्क २ गेमींग स्मार्टफोनमध्ये ६.३९ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस ( २३४० बाय १०८० पिक्सल्स ) क्षमतेचा व १९:५:९ अस्पेक्ट रेशो असणारा सुपर अमोलेड या प्रकारातील डिस्प्ले दिलेला आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८५५ हा अतिशय गतीमान प्रोसेसर दिलेला आहे. वर नमूद केल्यानुसार याचे ६ जीबी रॅम+६४ जीबी स्टोअरेज आणि १२ जीबी रॅम+२५६ जीबी स्टोअरेज असे दोन पर्याय सादर करण्यात आले आहेत. याच्या मागील बाजूस ४८ आणि १२ मेगापिक्सल्सच्या ड्युअल कॅमेर्‍यांचा सेटअप दिलेला आहे. तर यातील फ्रंट कॅमेरा २० मेगापिक्सल्सचा आहे. यात फास्ट चार्जींगच्या सपोर्टसह ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here