रोटेटींग ट्रिपल कॅमेर्‍यांनी युक्त सॅमसंग गॅलेक्सी ए ८० सादर

0

सॅमसंगने रोटेटींग ट्रिपल कॅमेर्‍यांनी युक्त असणारा गॅलेक्सी ए ८० हा स्मार्टफोन आज भारतीय ग्राहकांना सादर केला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए ८० या स्मार्टफोनचे मूल्य ४७,९९० रूपये असून याला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. हे मॉडेल प्रत्यक्षात १ ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. वर नमूद केल्यानुसार यातील वैशिष्ट्यपूर्ण फिचर म्हणजे यात रोटेट होणारा ट्रिपल कॅमेरा सेटअप प्रदान करण्यात आला आहे. यातील प्रमुख कॅमेरा ४८ मेगापिक्सल्सचा असून याला अल्ट्रा वाईड अँगलसह १२३ अंशाच्या व्ह्यू ने युक्त असणार्‍या ८ मेगापिक्सल्सचा दुसरा तर थ्रीडी टिओएफ डेप्थ सेन्सर या तिसर्‍या कॅमेर्‍याची जोड देण्यात आलेली आहे. या तिन्ही कॅमेर्‍यांच्या मदतीने अतिशय दर्जेदार प्रतिमा आणि चलचित्र काढता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. सेल्फी घेतांचा याच ट्रिपल कॅमेर्‍यांचा सेटअप फिरवून (रोटेट करून) समोर करता येतो. अर्थात, याच्या पुढील बाजूसही ट्रिपल कॅमेर्‍यांमधून सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींग करता येणार आहे. या कॅमेर्‍यांमध्ये सीन ऑप्टीमायझर, फ्लॉ डिटेक्शन आदी फिचर्स दिलेले आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी ए ८० या मॉडेलमध्ये २५ वॅटच्या सुपरफास्ट चार्जींग तंत्रज्ञानाने युक्त असणारी ३,७०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, यात ६.७ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस क्षमतेचा (२४०० बाय १०८० पिक्सल्स) सुपर अमोलेड या प्रकारातील इन्फीनिटी डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ७३० जी हा गतीमान डिस्प्ले देण्यात आला आहे. याची रॅम ८ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी असून ते वाढविता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here