दोन व्हेरियंटमध्ये मिळणार सॅमसंग गॅलेक्सी ए१०एस

0

सॅमसंगने गॅलेक्सी ए१०एस हा किफायतशीर मूल्य असणारा स्मार्टफोन दोन व्हेरियंटमध्ये भारतीय ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए१०एस या स्मार्टफोनचे अनावरण अलीकडेच करण्यात आले होते. आता हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आला आहे. याला २ जीबी रॅम+३२ जीबी स्टोअरेज आणि ३ जीबी रॅम+३२ जीबी स्टोअरेज अशा दोन पर्यायांमध्ये अनुक्रमे ९,४९९ आणि १०,४९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आलेले आहे. ग्राहक याला ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये खरेदी करू शकतात.

सॅमसंग गॅलेक्सी ए१०एस या मॉडेलमध्ये ६.२ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस म्हणजे १५२० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा इन्फीनिटी व्ही या प्रकारातील डिस्प्ले दिलेला आहे. याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेर्‍यांचा सेटअप असून यात १३ आणि २ मेगापिक्सल्सच्या कॅमेर्‍यांचा समावेश आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. यात ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीवर चालणारा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here