सॅमसंगने आपला ए३०एस हा स्मार्टफोन आता वाढीव अर्थात १२८ जीबी स्टोअरेजसह बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे.
सॅमसंग गॅलेक्सी ए३०एस हे मॉडेल सप्टेबर महिन्यात ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोअरेजच्या पर्यायात लाँच करण्यात आला होता. आता याची नवीन आवृत्ती ४ जीबी रॅम+१२८ जीबी स्टोअरेज अशा पर्यायात सादर करण्यात आली आहे. याचे मूल्य १५,९९९ रूपये असून याला देशभरातील शॉपीजमधून उपलब्ध करण्यात आले आहे.
सॅमसंग गॅलेक्सी ए३०एस या मॉडेलमध्ये ६.४ इंच आकारमानाचा, एचडी प्लस (१५६० बाय ७२० पिक्सल्स) क्षमतेचा, सुपर अमोलेड आणि इन्फीनिटी-यू या प्रकारातील डिस्प्ले दिलेला आहे. यात सॅमसंगचाच ऑक्टो-कोअर एक्झीनॉस ७९०४ हा प्रोसेसर आहे. याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेर्यांचा सेटअप आहे. यातील प्रमुख कॅमेरा २५ मेगापिक्सल्सचा असून याला ८ मेगापिक्सल्सचा वाईड अँगलयुक्त तर ५ मेगापिक्सल्सच्या डेप्थ सेन्सरच्या दोन अन्य कॅमेर्यांची जोड दिलेली आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यामध्ये १६ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. यात ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची असून याच्या सोबत १५ वॅट फास्ट चार्जर देण्यात आले आहे. ही बॅटरी दीर्घ काळापर्यंतचा बॅकअप देण्यास सक्षम असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.