सॅमसंग गॅलेक्सी नोट १० व नोट १० प्लस भारतात सादर

0

सॅमसंगने गॅलेक्सी नोट १० व नोट १० प्लस हे दोन फ्लॅगशीप मॉडेल्स भारतीय ग्राहकांना सादर केले आहेत.

सॅमसंगने काही दिवसांपूर्वीच गॅलेक्सी नोट १० व नोट १० प्लस या मॉडेल्सचे अनावरण केले होते. आज हेच दोन्ही स्मार्टफोन्स भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आले आहेत. यातील बहुतांश फिचर्स हे समान असून थोडा फरक हा डिस्प्लेचा आकार व क्षमता तसेच कॅमेर्‍यांमध्ये आहे. सॅमसंग गॅलेक्सी नोट १० हे मॉडेल ८ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोअरेज या पर्यायात उपलब्ध करण्यात आले आहे. तर सॅमसंग गॅलेक्सी नोट १० प्लस हे मॉडेल १२ जीबी रॅम+२५६ जीबी स्टोअरेज तसेच १२ जीबी रॅम+५१२ जीबी स्टोअरेजच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आले आहे.

सॅमसंग गॅलेक्सी नोट १० या मॉडेलमध्ये ६.३ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस (२२८० बाय १०८० पिक्सल्स ) क्षमतेचा डायनॅमिक अमोलेड इन्फीनिटी ओ डिस्प्ले दिलेला आहे. तर सॅमसंग गॅलेक्सी नोट १० प्लस या मॉडेलमध्ये ६.८ इंच आकारमानाचा व क्युएचडी प्लस ( ३०४० बाय १४४० पिक्सल्स ) क्षमतेचा डिस्प्ले दिलेला आहे. हे दोन्ही डिस्प्ले एचडीआर १० प्लस या मानकानुसार तयार करण्यात आलेले आहेत. यामुळे यावर अतिशय उच्च दर्जाच्या प्रतिमा व व्हिडीओची अनुभूती घेता येणार आहे. यात पंच होलप्रमाणे कोपर्यावर नव्हे तर मध्यभागी फ्रंट कॅमेरा प्रदान केलेला आहे. या दोन्ही मॉडेल्समध्ये ऑक्टा-कोअर एक्झीनॉस ९८२५ हा गतीमान प्रोसेसर दिलेला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी नोट १० या स्मार्टफोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेर्‍यांचा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा १२ मेगापिक्सल्सचा असून याला १२ आणि १६ मेगापिक्सल्सच्या अन्य दोन कॅमेर्‍यांची जोड दिलेली आहे. तर सॅमसंग गॅलेक्सी नोट १० प्लस या मॉडेलमध्ये या तिन्ही कॅमेर्‍यांना व्हीजीए क्षमतेचा अजून एक कॅमेरा जोडण्यात आलेला आहे. अर्थात, या मॉडेलच्या मागील बाजूस चार कॅमेर्‍यांचा सेटअप दिलेला आहे. तर या दोन्ही मॉडेल्समध्ये १० मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आलेला आहे. यातील सॅमसंग गॅलेक्सी नोट १० या मॉडेलमध्ये तर नोट १० प्लसमध्ये ४३०० मिलीअँपिअर क्षमतेच्या बॅटरी देण्यात आल्या आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन्स अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीवर चालणारे असून यावर वन युआय हा युजर इंटरफेस दिलेला आहे. या दोन्ही मॉडेल्समध्ये इन-डिस्प्ले या प्रकारातील फिंगरप्रिंट स्कॅनर व फेस अनलॉक फिचर्स दिलेले आहेत. यासोबत कंपनीने एस पेन हा स्टायलस पेनदेखील बाजारपेठेत सादर केला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी नोट १० हे मॉडेल भारतात ८ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोअरेज या पर्यायात ६९,९९९ रूपयात मिळणार आहे. तर सॅमसंग गॅलेक्सी नोट १० प्लस हे मॉडेल दोन व्हेरियंटमध्ये मिळणार आहे. याच्या १२ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोरेजच्या मॉडेलचे मूल्य ७९,९९९ रूपये आहे. तर १२ जीबी रॅम व ५१२ जीबी स्टोअरेजयुक्त व्हेरियंटचे मूल्य ८९,९९९ रूपये इतके आहे. भारतात हे सर्व व्हेरियंटस् ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here