सॅमसंग गॅलेक्सी एस१० लाईट व नोट १० लाईटची घोषणा

0

सॅमसंगने गॅलेक्सी एस१० लाईट आणि गॅलेक्सी नोट १० लाईट या दोन स्मार्टफोन्सला बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली असून याचे अनावरण करण्यात आले आहे.

सॅमसंगने आधीच एस१० आणि नोट १० हे उच्च श्रेणीतील मॉडेल्स लाँच केले असून याला चांगला प्रतिसाद लाभला आहे. या पार्श्‍वभूमिवर, आता या दोन्ही मॉडेल्सच्या लाईट आवृत्ती बाजारपेठेत उपलब्ध करण्यात येणार आहेत. हे मॉडेल्स मिड रेंज प्रिमीयम या विभागातील असून यामध्ये किफायतशीर मूल्यात उत्तमोत्तम फिचर्स देण्यात आलेले आहेत. अर्थात, हे फिचर्स मूळ आवृत्तीपेक्षा थोड्या कमी प्रतिचे आहेत.

गॅलेक्सी एस१० लाईट व नोट १० लाईट या मॉडेल्मध्ये काही फिचर्स समान आहेत. या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये ६.७ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस म्हणजेच २४०० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा एज-टू-एज या प्रकारातील व सेंटर होल पंच कॅमेरा असणारा डिस्प्ले प्रदान करण्यात आलेला आहे. या दोन्ही मॉडेल्सच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप असून यातील गॅलेक्सी एस१० लाईट मध्ये प्रमुख कॅमेरा ४८ मेगापिक्सल्सचा असून याला १२ मेगापिक्सल्सचा अल्ट्रा वाईड लेन्स व ५ मेगापिक्सल्सचा फिक्स्ड फोकस मॅक्रो लेन्सयुक्त कॅमेर्‍यांची जोड दिलेली आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी या दोन्ही मॉडेल्समध्ये ३२ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. तर नोट १० लाईटमध्ये तिन्ही कॅमेरा १२ मेगापिक्सल्सचे आहेत. दोन्हींमध्ये फास्ट चार्जींगयुक्त ४५०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी आहे. तर हे स्मार्टफोन्स अँड्रॉइड १० आवृत्तीवर चालणारे असून यावर वनयुआय हा युजर इंटरफेस देण्यात आला आहे.

गॅलेक्सी एस१० लाईट या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोअर ८५५ प्रोसेसर दिला आहे. याची रॅम ६/८ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी इतके असेल. तर नोट १० लाईटमध्येही याच प्रकारात ६/८ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेज दिलेले आहे. हे नोट सेरीजमधील मॉडेल असल्याने यासोबत ब्लु-टुथ कनेक्टीव्हिटी असणारा स्टायलास पेन देण्यात येणार आहे. याच्या मदतीने डिस्प्लेवर रेखाटन करण्यात येणार आहे.

गॅलेक्सी एस१० लाईट व नोट १० लाईट या मॉडेल्सचे अनावरण करण्यात आले असून लवकरच ते भारतासह विविध राष्ट्रांमध्ये उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीतर्फे देण्यात आलेली आहे. यांचे मूल्य आणि उपलब्धता याबाबत लवकरच माहिती देण्यात येणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here